घरदेश-विदेशCoronavirus: देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ हजारांवर; ५९० रूग्णांचा बळी

Coronavirus: देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ हजारांवर; ५९० रूग्णांचा बळी

Subscribe

कोरोना रूग्णांची संख्या १८ हजाराच्या पुढे गेली असून सध्या ही संख्या १८ हजार ६०१ झाली आहे. तर ५९० लोकांचा कोरोनाने बळी घेतला

कोरोनाचे संकंट दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या १८ हजाराच्या पुढे गेली असून सध्या ही संख्या १८ हजार ६०१ झाली आहे. तर ५९० लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४७ लोकांचा कोरोनाने बळी गेला असून आतापर्यंत मृतांचा सर्वाधिक आकडा समोर आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसह सरकारच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे.

- Advertisement -

उपचारानंतर ३ हजार २५२ रूग्ण बरे

सोमवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रूग्णांची संख्या १७ हजार सहाशेच्या जवळपास होती. त्यावेळी ५५९ लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मागील आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाने बाधित झालेल्या रूग्णांची संख्या १ हजार ३३६अशी सर्वाधिक नोंद झाली आहे. तसेच यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे योग्य उपचारानंतर ३ हजार २५२ रूग्ण बरे झाले असून निरोगी लोकांच्या आकडेवारीतही सतत वाढ होत आहे.

जगभरात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात या व्हायरसमुळे १ लाख ६५ हजार ७३९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २४ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक बळी हे युरोपमध्ये गेले असून उत्तर अमेरिकेत ४३ हजार ३६९, आशियात १४ हजार ८४०, दक्षिण अमेरिकेत ३ हजार ८५०, आफ्रिकेत १ हजार १२८ आणि ऑस्ट्रेलियामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक २३ हजार ६६ज जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये २० हजार ८५२ लोकांचा मृत्यू झाला तर फ्रान्समध्ये १९ हजार ७१८, ब्रिटनमध्ये १६ हजार ६०, बेल्जियममध्ये ५ हजार ५२८ आणि जर्मनीत ४ हजार ६४२ मृत्यू झाले.


Lockdown: नियम शिथिल होताच मुंबईच्या वेशीवर लोकांची गर्दी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -