घरताज्या घडामोडीCoronaVirus: पुढील दहा दिवसात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढणार!

CoronaVirus: पुढील दहा दिवसात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढणार!

Subscribe

देशासाठी कोरोना विषाणूच्या लढ्यात पुढील दहा दिवस सर्वात आव्हानात्मक असतील. आयसीएमआर वैज्ञानिकांच्या मतांनुसार, ३० एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा फैलाव तीव्र स्वरुपात होणार आहे आणि यादरम्यान कोरोनाग्रस्तांची दररोज वाढत जाईल. म्हणजे देशात कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचणार आहे. परंतु यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळेच कोरोनाचे नवीन रुग्णांची संख्या ज्या जिल्हात वेगाने वाढत आहे. त्या जिल्ह्यातील केंद्र सरकार सूत्रे हाती घेतली आहेत. त्याकरिता सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी दोन पथक महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि प्रत्येकी एक एक मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी आहेत. त्यामध्ये अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकारी असतील. जेणेकरून ते वरिष्ठेच्या आधारे ठोस निर्णय घेऊ शकतील.

देशातील कोरोनाच्या संकटात काही राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असल्यामुळे चिंता देखील वाढत आहे. यामुळेच गंभीर परिस्थिती असलेल्या राज्य आणि जिल्ह्यातील सूचनांचे पालन केले जाण्याची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्या हातात घेतली आहे. गृहमंत्रालयाच्या मते, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे, पश्चिम बंगालमधील कलकत्ता, हावडा मेदिनीपूर पूर्व, नॉर्थ २४ पर्गानास, दार्जलिंग, कलिम्पोंग, जलपाईगुडी, मध्यप्रदेशातील इंदौर आणि राज्यस्थानमधील जयपूर येथील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

- Advertisement -

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, लॉकडाऊनचे आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन येथील लोकांनी न केल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येथून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी विशेष सहा पथक तैनात करण्यात आली आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: गोव्यानंतर आता ‘हे’ राज्य कोरोनामुक्त!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -