घरCORONA UPDATEDolo 650 गोळीने मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड; कोरोनाच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंती

Dolo 650 गोळीने मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड; कोरोनाच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंती

Subscribe

Dolo 650 Sale: गेल्या एका वर्षात डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप यापासून आराम मिळावा यासाठी कोणती गोळी वापरली आठवतेय का? आठवत नसेल तर हरकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणती गोळी वापरली असेल. एकतर तुम्ही क्रोसिन किंवा डोलो 650 वापरली असेल. या काळात संपूर्ण भारताने सर्वाधिक वापरलेली गोळी म्हणजे Dolo 650. त्यामुळे कोरोना लसींपाठोपाठ आता डोलो 650 ही गोळी सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. औषधांचे सर्वाधिक मार्केट एकट्या डोलो नावाच्या गोळीने खाल्ले आहे. ताप उतरवणारी या गोळीने मात्र इतर पॅरासिटामॉल कंपन्यांचा ताप वाढवला आहे.

मार्च 2020 पासून 567 कोटी रुपयांच्या डोलो 650 गोळीची विक्री झाली आहे. एवढेच नाही तर या गोळीला कोरोनाच्या काळात आवडता ‘स्नॅक’ म्हटले जात आहे. एका वर्षात त्याची इतकी विक्री झाली की गेल्या आठवड्यात #Dolo650 सोशल मीडियावर मेम फेस्टमध्ये ट्रेंड करत होता. या गोळीच्या एका पाकिटात 15 गोळ्या नोव्हेंबर 2021 पर्यंत डोलोच्या 14.5 कोटी पाकीटं विकली गेली. तर 2019 मध्ये भारतात याच गोळीच्या 7.5 कोटी पाकीटं विकली गेली.

- Advertisement -

जानेवारी 2020 पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, Dolo 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात पॅरासिटामोलचे 37 ब्रँड आहेत, ज्यांची विक्री देशातील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे. Dolo 650 ची निर्मिती बंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडद्वारे केली जाते. दुसरीकडे, जीएसके फार्मास्युटिकल्स कॅल्पोलचे उत्पादन करते आणि या दोन्ही गोळ्या सामान्यतः डॉक्टर रुग्णांसाठी लिहून देतात.

डोलो 650 ची डिसेंबर 2021 मध्ये 28 कोटी रुपयांची विक्री कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाली. एप्रिलमध्ये त्याच्या विक्रीने 48.9 कोटी कमावले तर मेमध्ये 44.2 कोटी रुपये कमावले. भारतात तापासाठी क्रोसिन नावाची लोकप्रिय गोळी वापरली जाते. मात्र कोरोनात डोलो नावाच्या या गोळीने क्रोसिनची जागा मिळवली आहे.


“हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा” पोलिसांनी नाना पटोलेंना अटक करावं, नारायण राणेंची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -