घरदेश-विदेशइंदिरा गांधींचा हवाला देत राहुल गांधी यांचा आता 'प्रतिमा सुधारो'वर भर

इंदिरा गांधींचा हवाला देत राहुल गांधी यांचा आता ‘प्रतिमा सुधारो’वर भर

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रेचा सध्या दिल्लीत मुक्काम आहे. या यात्रेद्वारे पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचा आहे. त्याचबरोबर त्यांनी आता आपली प्रतिमा सुधारण्यावर देखील भर दिला आहे. त्यांनी यासाठी आपली आजी इंदिरा गांधी यांचा हवाला देखील दिला आहे.

सोशल मीडियावर राहुल गांधी यांची ‘पप्पू’ अशी प्रतिमा आहे. भाजपासह अन्य विरोधी पक्ष त्यांचा ‘पप्पू’ असा उल्लेख करतात. त्यांच्या प्रचाराचा एक भाग असल्याने विरोधकांनी आपल्याला ‘पप्पू’ म्हणायला हरकत नाही. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, हे मला माहीत आहे. त्यांच्या आयुष्यात काही घडत नाही. आमच्या या यात्रेमुळे ते निराश झाले आहेत, त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत. मला असे काही संबोधले जाते, त्याची पर्वा नाही. मला काहीही संबोधू शकता. मला ते मनावर घेण्याची गरज नाही. उलट मी तर सांगेन की, त्यांनी मला आणखी नावे ठेवावीत, असे ते म्हणाले.

- Advertisement -

माझी आजी इंदिरा गांधी यांनाही ‘गूंगी गुडिया’ म्हटले जायचे, पण आज त्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जातात. ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. माझी दुसरी आई होती, असे त्यांनी सांगितले. तुमच्या आयुष्यात इंदिरा गांधींचे गुण असलेली स्त्री हवी आहे का? असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले, माझ्या आई आणि आजीच्या गुणांचे मिश्रण असेल तर, चांगले आहे.

लाल किल्ल्यावर देखील प्रतिमेचाच मुद्दा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी (24 डिसेंबर 2022) राजधानी दिल्लीत पोहोचली. ती लाल किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्यांना संबोधित केले होते. तेव्हा देखील त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता.

- Advertisement -

माझी प्रतिमा बिघडवण्यासाठी भाजपाने हजारो कोटी रुपये खर्च केले. प्रसार माध्यमे, सोशल मीडिया तसेच इतर साधनांचा वापर केला. मी काहीही बोललो नाही. शांत राहिलो. मी फक्त पाहिले की, यांच्यात किती ताकद आहे. पण आता एका महिन्यात मी सत्य काय आहे, ते दाखविले. सत्य लपविता येत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -