घरताज्या घडामोडीजिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; दररोज फ्रीमध्ये मिळणार 2GB एक्स्ट्रा डेटा

जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; दररोज फ्रीमध्ये मिळणार 2GB एक्स्ट्रा डेटा

Subscribe

आता जिओच्या ग्राहकांना दररोज 2 GB एक्स्ट्रा डेटा वापरायला मिळणार आहे.

जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ कंपनी ग्राहकांसाठी 2 GB एक्स्ट्रा डेटा मोफत देत आहे. दररोज कंपनीकडून 2 GB एक्स्ट्रा डेटा ग्राहकांना मिळत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 2 GB डेली डेटा बेनिफिट ऑफर करत जिओ डेटा पॅक लाँच केला आहे. मार्च महिन्याच्या अखेरेस कंपनीने ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये हा डेटा पॅक क्रेडिट केला आहे. टेलिकॉम टॉकच्या माहितीनुसार, आता पुन्हा कंपनी असाच प्रकार करत आहे आणि ग्राहकांना चार दिवसांच्या  व्हॅलिडिटी सोबत दररोज 2 GB एक्स्ट्रा डेटा मोफतमध्ये दिला जात आहे.

२७ एप्रिलपासून ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये दररोज 2 GB एक्स्ट्रा डेटा कंपनी क्रेडिट केला जात आहे. काही ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये २८ एप्रिलला देखील क्रेडिट होत आहे. या एक्स्ट्रा डेटाची व्हॅलिडिटी चार दिवसांपर्यंत आहे. ज्या जिओ ग्राहकांच्या मोबाईलमध्ये ५९९ रुपयांच्या प्लन अॅक्टिव्ह आहे त्यांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. मात्र जिओ या नव्या ऑफरमुळे आता दररोज एकूण ३.५ जीबी डेटा मिळत आहे.

- Advertisement -

यापूर्वी जिओच्या ६९९ च्या प्लॅनमध्ये 156 GB डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच हा पॅक तुम्ही २८ दिवस वापरू शकता. तसेच जिओच्या २ हजार ९९ रुपयाच्या पॅकमध्ये 538 GB डेटा देण्यात आला आहे. मात्र, या प्लॅनमध्ये देखील कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच हा पॅक तुम्ही ९८ दिवस वापरू शकता. शिवाय जिओ लिंकचा हा प्लॅन ४ हजार १९९ रुपयाचा असून यामध्ये 1076GB डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा डेटा तुम्ही १९६ दिवस वापरू शकता.


हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच; २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा बळी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -