घरदेश-विदेशRepublic Day 2024: 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर घडणार 'स्त्री शक्ती'चं...

Republic Day 2024: 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर घडणार ‘स्त्री शक्ती’चं दर्शन

Subscribe

75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर स्वावलंबन, महिला शक्ती आणि विकसित भारताची झलक पाहायला मिळणार आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता,  एकता आणि प्रगती यासह वाढत्या स्वदेशी क्षमतांच्या पाठबळाने निर्माण झालेले लष्करी सामर्थ्य आणि वृद्धिंगत होणाऱ्या नारी शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी कर्तव्यपथ सज्ज आहे. (Republic Day 2024 On the occasion of the 75th Republic Day Stri Shakti will be seen on the road of duty)

‘विकसित भारत’ आणि ‘भारत -लोकशाहीची जननी’ या दुहेरी संकल्पनेवर आधारित, यावर्षीच्या संचलनामध्ये सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग असणार आहे. हा उपक्रम सर्व स्तरातील लोकांना या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारा आणि सरकारमधील लोकसहभागाला प्रोत्साहन देणारा ठरेल.

- Advertisement -

प्रथमच, 100 हून अधिक महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची  सुरुवात करणार आहेत. या महिला कलाकारांद्वारे वाजवल्या जाणार्‍या शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीताने संचलनाची सुरुवात होईल. कर्तव्यपथावर पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र  तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळणार आहे. महिला वैमानिकही नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ)तुकड्यांमध्ये केवळ महिला जवान असणार आहेत.

पथसंचलन

प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे हे संचलन राहणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होईल,यावेळी पंतप्रधान राष्ट्राचे नेतृत्व करत, देशाच्या संरक्षणार्थ हुतात्मा झालेल्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्यपथावरील अभिवादन मंचाकडे जातील.

- Advertisement -

परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर स्वदेशी तोफा प्रणाली 105-मिमी भारतीय फील्ड गनसह 21 तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत होईल. 105 हेलिकॉप्टर युनिटचे चार एमआय -17 आयव्ही हेलिकॉप्टर्स कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांवर पुष्पवर्षाव करतील. यानंतर ‘आवाहन’ या  नारी शक्तीचे प्रतीक असलेल्या 100 हून अधिक महिला कलाकारांचा विविध प्रकारची तालवाद्ये वाजवणाऱ्या बँडचे सादरीकरण होणार आहे.

75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर स्वावलंबन, महिला शक्ती आणि विकसित भारताची झलक पाहायला मिळणार आहे. यावेळी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत फ्रेंच राफेलही उड्डाण करणार आहे. परेडमध्ये फ्रान्सच्या फॉरेन लीजनचे सैनिकही भाग घेत आहेत, ज्यामध्ये भारतीय वंशाचे 5 ते 6 सैनिकही असतील. प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात शंखध्वनीने होईल ज्यामध्ये जवळपास 100 कलाकार एकाच वेळी शंखनाद करणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये स्त्री शक्तीची झलक

अग्निवीर, वायू अग्निवीर आणि नौदल अग्निवीर यांची एकत्रित तुकडी प्रथमच परेडमध्ये उपस्थित राहणार असून त्यात प्रत्येकी 48 सैनिकांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त, 105 एमएम तोफांमधून 21 तोफांची सलामी दिली जाईल आणि एकूण 52 सेकंदांसाठी 2.4 सेकंदांच्या अंतराने शेल डागले जातील. यापूर्वी 25 फाउंडर गनमधून 21 तोफांची सलामी दिली जात होती, परंतु गेल्या वर्षी ती काढून टाकण्यात आली होती आणि 105 मिमी देशी हलकी तोफा समाविष्ट करण्यात आली आहे.

स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकूर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यावर असलेल्या हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत.

(हेही वाचा Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी देशभक्तीवर आधारित ‘ही’ गाणी जरूर ऐका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -