घरताज्या घडामोडीRepublic Day : 26 जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची...

Republic Day : 26 जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता ;’IB’चा इशारा

Subscribe

अवघ्या काही दिवसांवर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. मात्र यंदा 26 जानेवारीला दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंटेलिजन्स ब्युरोने (IB) दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त दहशतवादी नेत्यांसह काही व्हीआयपी लोकांना लक्ष्य करण्याचा या हल्ल्यामागील हेतू असल्याचे आयबीने सांगितले आहे.

अवघ्या काही दिवसांवर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. मात्र यंदा 26 जानेवारीला दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंटेलिजन्स ब्युरोने (IB) दिल्ली पोलिसांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त दहशतवाद्यांचा नेत्यांसह काही व्हीआयपी लोकांना लक्ष्य करण्याचा या हल्ल्यामागील हेतू असल्याचे आयबीने सांगितले आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून भारतात स्फोटके आणल्याचा इंटेलिजन्स ब्युरोचा दावा आहे. गाझीपूर मंडीत सापडलेला आयईडी त्याचाच एक भाग होता. ज्या पद्धतीने जम्मू विमानतळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला, त्याच धर्तीवर दहशतवादी ड्रोनने हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, दिल्लीत १५ फेब्रुवारीपर्यंत ड्रोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

आयबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिस प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. गाडीमध्ये स्फोटके ठेवून संघटना इंडिया गेट आणि लाल किल्ल्याभोवती हल्ला करू शकतात. शिख फॉर जस्टिस गेल्या वर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवण्याच्या घटनेची पुनरावृत्ती करू शकते.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी सीमेवर गस्त वाढवण्यासोबतच तपास वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर इंडिया गेट आणि गर्दीच्या ठिकाणीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोबाईल पोलिस कंट्रोल रुम व्हॅनचाही सुरक्षा व्यवस्थेत वापर करण्यात येणार असून, त्यामुळे संशयितांवर तात्काळ कारवाई केली जाईल.दिल्ली पोलिसांनी 20 जानेवारीपासून राजधानीला ड्रोनवर बंदी घातली आहे. याअंतर्गत दिल्लीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, यूएव्ही, लहान मायक्रो एअरक्राफ्ट, एअर बलूनवर बंदी घालण्यात येणार आहे.


हेही वाचा – Coronavirus : राज्यात कोरोनाची लाट नियंत्रणात; आरोग्य मंत्र्यांची माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -