घरCORONA UPDATECovishield आणि Covaxin ला बाजारात विकण्यासाठी मंजुरी द्या, तज्ज्ञ समितीने केली शिफारस

Covishield आणि Covaxin ला बाजारात विकण्यासाठी मंजुरी द्या, तज्ज्ञ समितीने केली शिफारस

Subscribe

मात्र SEC ने दोन्ही कंपन्यांकडून अधिक डेटा आणि माहिती मागवली होती.

देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने बुधवारी कोरोनाविरोधी कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लसींना बाजारात विक्रीसाठी मान्यता देण्याची शिफारस केली. सध्या, देशात या दोनचं लसींना आपत्कालीन वापरास परवानगी आहे. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) Covishield आणि भारत बायोटेकने Covaccine या लसींच्या नियमित बाजार विक्रीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज जमा केला होता.

SII चे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंह यांनी 25 ऑक्टोबर रोजी DCGI कडे या संदर्भात अर्ज सादर केला होता. DCGI याच्या पुणेस्थित कंपनीकडून अधिक डेटा आणि कागदपत्रे मागितली होती, त्यानंतर सिंग यांनी नुकताच अधिक डेटा सादर केला. यावर सिंह यांनी उत्तरात म्हटले की, भारतात फेज 2/3 क्लिनिकल अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे देशासह जगभरातील लोकांना आतापर्यंत 100 कोटींहून अधिक डोस कोव्हिशील्ड लसी दिल्या आहेत.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, ‘कोविडशील्ड लसीमुळे कोरोनाला रोखण्यासाठी आणि कोरोनाविरोधात सुरक्षा प्रधान करण्यासाठी मोठी मदत मिळाली. या अर्जात हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या संचालक व्ही कृष्ण मोहन यांनी कोवॅक्सीनसाठी नियमित विक्रीसाठी मंजूरी मागण्याबरोबरचं लसी संबंधित संपूर्ण माहिती दिली.

व्ही कृष्ण मोहन यांनी अर्जात म्हटले होते की, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने भारतात कोवॅक्सिन लस विकसित करणे, त्याचे उत्पादन करणे आणि वैद्यकीयदृष्ट्या मूल्यमापन करण्याचे आव्हान स्वीकारले. दरम्यान कोरोनावर काम करणारे तज्ञ समितीने (एसईसी) बुधवारी आढावा घेतला. यात SII आणि भारत बायोटेकचे दुसऱ्यांदा अर्ज करत Covishield आणि Covaccine च्या नियमित बाजार विक्रीसाठी काही अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. मात्र SEC ने दोन्ही कंपन्यांकडून अधिक डेटा आणि माहिती मागवली होती.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -