घरदेश-विदेशRishabh Pant Accident: ऋषभ रस्त्यावर तडफडत असताना काहीजण पैसे गोळा करत व्हिडीओ...

Rishabh Pant Accident: ऋषभ रस्त्यावर तडफडत असताना काहीजण पैसे गोळा करत व्हिडीओ काढत होते

Subscribe

ऋषभने गाडीची काच फोडून कसा बसा आपला जीव वाचवला. पण त्यानंतर मदतीसाठी तो लोकांकडे गयावया करत असताना अनेकजण मदतीऐवजी त्याचा व्हिडीओ काढत होते.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंत यांच्या मर्सिडीज कारला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की डिवायडरला आदळल्यावर कारने लगेचच पेट घेतला. यावेळी आत अडकलेल्या ऋषभने गाडीची काच फोडून कसा बसा आपला जीव वाचवला. पण त्यानंतर मदतीसाठी तो लोकांकडे गयावया करत असताना अनेकजण मदतीऐवजी त्याचा व्हिडीओ काढत होते.

अपघात झाला तेव्हा ऋषभच्या कारमध्ये तीन ते चार लाख रुपये होते. अपघात होताच हे पैसे रस्त्यावर विखुरले. हे पाहताच अनेकांनी ऋषभला मदत करण्याऐवजी पैसे गोळा करत त्याचा व्हिडीओ काढत होते. तर ऋषभ वेदनेने तडफडत होता. त्याचवेळी तिथे दोनजण आले त्यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली आणि अॅम्ब्युलन्स पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर ऋषभला देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या दोन तरुणांनी धावपळ केली. ते त्याच्याबरोबरच रुग्णालयातही थांबले होते.

- Advertisement -

यातील एकजण घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या साखर कारख्यानात नोकरी करतो. सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर जात असताना ऋषभच्या गाडीला अपघात झाला. त्याने लगेचच ऋषभ पंतला ओळखले. ज्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ऋषभची प्रकृती गंभीर होती. पण दोन युवकांनी प्रसंगावधान ओळखत त्याला वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने ऋषभवर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -