घरमहाराष्ट्रकाँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून...; चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून…; चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखं ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांमुळे गेल्या दिवसांपासून वादंग उठलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ब्रिटिनमधून आणण्यात येणारी वाघनखं ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. याचपार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. (From false tigers enslaving Congress claims Chitra Wagh criticism of Aaditya Thackeray Uddhav Thackeray)

हेही वाचा – सरकारकडे परदेशवाऱ्यांवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर…, आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी ट्वीट करताना म्हटले की, आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे. छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला त्यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत. पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे. आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे. पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परतावा आहेत की, भाडेतत्वावर घेऊन येणार आहात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले होते की, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट यांच्या वेबसाईटनुसार भारतात येणारी वाघनखं ही ब्रिटिश इतिहासकारांच्या संग्रहातील आहे. ही वाघनखं जनमानसाच्या दर्शनाकरिता तीन वर्षासाठी कालावधीसाठी भारतात येणार असल्याचं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने मान्य केलं आहे. त्यामुळे भारतात येणारी वाघनखं शिवकालीन आहेत का? महाराजांनी वापरलेली आहेत का? कर्जावर आहेत की, परतावा? याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे. जर परतावा असेल, तर चांगले आहे. सर्व मंत्रीमंडळांनी वाघनखांचं स्वागत करावं. महाराजांचे मंदिर बांधावे आणि त्यात ही वाघनखं ठेवली जावी, असे आदित्य ठाकरे म्हणालेहोते.

हेही वाचा – याचा अर्थ पेपर फुटला आहे… धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

वाघनखांबाबत उद्या होणार करार

सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. आज ते लंडन येथील टॅव्हिस्टोक चौक येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित रहातील. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून मुनगंटीवार चर्चा करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहलायचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील. यानंतर लगेच दूरदृश्याप्रणालीद्वारे पत्रकार परिषद घेत सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी संवाद साधतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -