घरदेश-विदेशRussia-Ukraine War : कीवमधील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी; उपचारांसाठी रुग्णालयात...

Russia-Ukraine War : कीवमधील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Subscribe

युद्धाच्या दरम्यान रशियन हल्ल्यामुळे 10 लाख युक्रेनियन लोकांना त्यांची मायभूमी सोडून इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागल्याचा अंदाज यूएनने व्यक्त केला आहे.

युक्रेन गेल्या 9 दिवसांपासून युद्धाच्या आगीत जळत आहे. रशियाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 10 हून अधिक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, युक्रेनमधील विविध शहरांतील भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा चालवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कीवमध्ये आणखी एक भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. अशी स्थितीत विद्यार्थ्याला उपचारांसाठी कीव शहरात दाखल करण्यात आले आहे. या युद्धात आत्तापर्यंत 1500 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पोलंडमध्ये गेलेल्या भारताचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

याआधी बुधवारी युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तो पंजाबचा रहिवासी होता. आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी, हवाई हल्ल्यात खारकीव येथे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, जो कर्नाटकचा रहिवासी होता.

- Advertisement -

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत, हवाई दलासह 19 फ्लाइट्सद्वारे गुरुवारी युक्रेनच्या शेजारील देशांमधून 3726 लोकांना घरी आणण्यात आले. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट केले की, ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना गुरुवारी बुखारेस्ट येथून 8, बुडापेस्ट येथून 5, सुसिआवा येथून 2, कोसेस येथून 1 आणि रेजेजॉ येथून 3 फ्लाइटने आणण्यात आले. ही उड्डाणे दिल्ली, मुंबई, हिंडन इत्यादी विमानतळांवर उतरली. अॅडव्हायजरी जारी झाल्यापासून, ऑपरेशन गंगा अंतर्गत 17,000 भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

युद्धाच्या दरम्यान रशियन हल्ल्यामुळे 10 लाख युक्रेनियन लोकांना त्यांची मायभूमी सोडून इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागल्याचा अंदाज यूएनने व्यक्त केला आहे. युक्रेनमधील हल्ल्यात 209 नागरिक मारले गेल्याचे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले.


Russia Ukraine War : युरोपातील सर्वात मोठ्या अणु उर्जा प्रकल्पातून निघाले धुराचे लोट; चेर्नोबिलपेक्षा 10 पटीने मोठा स्फोट, युक्रेनचा दावा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -