घरदेश-विदेशSahara Group : 2.5 लाख छोट्या गुंतवणूकदारांना 241 कोटी रुपये केले परत;...

Sahara Group : 2.5 लाख छोट्या गुंतवणूकदारांना 241 कोटी रुपये केले परत; अमित शहांची माहिती

Subscribe

देशाची अर्थव्यवस्ता 5 ट्रिलियन डॉलर होण्यासाठी सहकारी संस्थांचा मोठा वाटा असेल, असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले.

मुंबई : सहकार मंत्रालयाचे मंत्री अमित शहा यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 41000 स्क्वेअरफूटमध्ये पसरलेल्या सीआरसीएसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यावेळी सहारा इंडिया को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये 2.5 लाख छोट्या गुंतवणूकदारांना 241 कोटी रुपये परत केल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात सहारा-सेबी रिफंड खात्यात 5,000 कोटी रुपये सहकारी संस्थांच्या केंद्रीय रजिस्ट्रारला ट्रान्सफर करण्याचे निर्देश दिले होते.

अमित शहा म्हणाले, “आतापर्यंत सहारामध्ये अडकलेल्या 1.5 कोटी गुंतवणूकदारांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले होते. त्या पोर्टलवर एकूण 19,999 रुपयांपर्यंतचे दावे आतापर्यंत स्वीकारण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली. सहकारी संस्थासंदर्भात अमित शहा म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होण्यासाठी सहकारी संस्थांचा मोठा वाटा असेल. देशाचे सहकार क्षेत्र 19 व्या शतकापासून ते 21 व्या शतकात वाटचाल करेल, असे निश्चित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

गेल्या वर्षी जुलै महिन्यात 10 कोटी लोकांचे सहारा इंडिया को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्याचे पैसे परत दिले जाणार आहे. लोकांचे पैसे परत करण्याची सुरुवात ही 4 कोटी गुंतवणूक दारापासून होणार आहे, असेही अमित शहांनी ‘सहारा रिफंड पोर्टल’वेळी म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -