घरदेश-विदेश'अब ना रण होगा, ना रन होगा', नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाची काँग्रेसवर...

‘अब ना रण होगा, ना रन होगा’, नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाची काँग्रेसवर टीका

Subscribe

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉण़्ड्रिंग प्रकरणी ईडीने यंग इंडियाचे कार्यालय सील केल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे ईडीच्या रडारवर आहेत. हाच संदर्भ घेत भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या प्रकरणावरून काँग्रेसचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे नेते आधी सांगायचे की, सत्याग्रह होईल. पण आता म्हणतात, आता याचना नव्हे तर, रण होईल. पण वास्तवात ना रण होणार ना ‘रन’ (पळून जाणे किंवा फरार होणे) होणार, असा पलटवार त्यांनी केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसला नक्की काय हवे आहे? देशाच्या कायद्याशी त्यांना युद्ध वा संघर्ष करण्याची गरज आहे का? असे सवाल संबित पात्रा यांनी केले. ईडी ने सील केलेल्या यंग इंडिया या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हिस्से आहेत. या कारवाईमुळे नाराज झालेल्या काँग्रेसने केंद्र सरकार व भाजपावर टीका केली आहे.

काँग्रेस स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजते. देशातील कायद्याशी संघर्ष करण्याची काय गरज आहे? याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल, असे संबित पात्रा म्हणाले. काँग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खर्गे पक्षाच्या कार्यालयात जसे गेले तसे, ईडीची कारवाई रोखण्यासाठी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात का गेले नाहीत? ही कारवाई रोखण्यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. ही कारवाई नियमानुसार होत असल्याचे कोर्ट सांगेल, हे त्यांना माहीत असल्याने ते कोर्टात गेले नाहीत, असे सांगून संबित पात्रा म्हणाले की, या प्रकरणातून आम्ही काँग्रेसला पळू देणार नाही.

- Advertisement -

राहुल गांधींवर निशाणा
संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. तुमचे हात स्वच्छ होते तर, २०१०मध्ये तुम्ही का नाही सांगितले की, आपण यंग इंडिया कंपनीचे संचालक आहेत. देशाचे कायदे सर्वांसाठी समान आहेत. पण काँग्रेसच्या एका कुटुंबाला आपण त्याच्या वर आहोत, असे वाटते. या कुटुंबाला वाचविण्यासठी काँग्रेस रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आाहे, असेही त्यांनी नमूद केले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -