घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन; भाजपचा मविआ सरकारवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन; भाजपचा मविआ सरकारवर निशाणा

Subscribe

राज्यात महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाले. या सरकारने स्थापनेच्या पहिल्या कॅबिनेटपासूनअनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरु केला. अशात काही महिन्यांपूर्वी राज्यातील लाल परी अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाला ब्रेक लागला होता. याच एसटी महामंडळाला आता रुळावर आणण्यासाठी नव्या सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महामंडळाला नवसंजीवणी देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजूरी दर्शवली आहे. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, राष्ट्रवादीची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

वेतन, महागाई भत्ता यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील हजारो एसटी कर्मचारी संपावर गेले होते. महिनाभार एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरु होता. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध एसटी कर्मचारी असा संघर्ष पाहायला मिळाला. मविआ सरकारच्या मध्यस्थीनंतरही एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत अनेक जिल्हे आणि गाव यांच्यातील संपर्क तुटला होता. खेड्यापाड्यातील अनेकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. यात पगार वाढ ही एक महत्त्वाची मागणी मान्य झाली. परंतु एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीवरचं अनेक एसटी कर्मचारी अडून होते. मात्र या संपामुळे एसटी महामंडळाला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. याच मुद्द्यावरूनआज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देशातील ज्वलंत प्रश्नांविरोधात उद्या काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन; राजभवनालाही घालणार घेराव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील पगारासाठी 100 कोटी रुपये देण्यास मंजूरी दिली. हाच मुद्दा पकडून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले की, मविआ सरकारच्या काळात झालेली 100 कोटींची चर्चा आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये होत असलेली 100 कोटींची चर्चा, किती फरक आहे पाहा… एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले आहेत. शिवसेना भाजपा सरकारचे धन्यवाद… असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगार देण्यासाठी एसटी महामंडळाला 360 कोटींची आवश्यकत आहे. यात राज्य शासनाने चालु आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटींची तरतूद केली आहे. यातील 300 कोटी रुपये एप्रिलसाठी, तर 360 कोटी रुपये मे महिन्याच्या पगारासाठी देण्यात आले आहेत.


हेही वाचा : व्हेंटिलेशन नाही, मला गुदमरायला होतंय, राऊतांच्या तक्रारीनंतर कोर्टाचे ईडीला आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -