घरक्राइमSandeshkhali case : शाहजहान शेखला त्वरित सीबीआयकडे सोपवा, कलकत्ता हायकोर्टाचे आदेश

Sandeshkhali case : शाहजहान शेखला त्वरित सीबीआयकडे सोपवा, कलकत्ता हायकोर्टाचे आदेश

Subscribe

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख आणि संदेशखळी प्रकरण हे दोन्ही आजच (मंगळवारी) सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. संदेशखळी येथे 5 जानेवारी रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. याप्रकरणी गुरुवारी (29 फेब्रुवारी) पहाटे शहाजहान शेखला उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथून अटक करण्यात आली होती.

हेही वाचा – Nitin Gadkari : गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर…, ठाकरे गटाचे फडणवीसांवर शरसंधान

- Advertisement -

तृणमूल काँग्रेस पक्षाने शहाजहान शेखला 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता सीबीआय लवकरच आपल्या ताब्यात घेईल. मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर सोमवारीसुद्धा या प्रकरणावर सुनावणी झाली होती. ईडी, राज्य सरकार आणि सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.

- Advertisement -

न्यायालयाने राज्य पोलिसांसाह एसआयटी स्थापन करण्याचा पूर्वीचा आदेश रद्द केला आणि राज्याला तातडीने सर्व कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता नजत पोलीस ठाणे आणि बोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेले तीनही गुन्हे सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहेत. ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी नेमण्यात आलेली एसआयटी उच्च न्यायालयाने बरखास्त केली.

हेही वाचा – Nana Patekar : देशात कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा, नाना पाटेकरांचा शेतकऱ्यांना सल्ला

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमधील रेशन वितरणात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी ईडीने सर्वप्रथम बंगालच्या माजी मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक केली होती. त्यानंतर शाहजहान शेख आणि बनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्य यांचाही सहभाग उघडकीस आला. यासंदर्भात ईडीचे पथक 5 जानेवारीला शहाजहान शेख याच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचले असता, हजारो लोकांनी तया पथकावर हल्ला केला होता. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्राद्वारे दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 307 (हत्येचा प्रयत्न), 333 (लोकसेवकाला गंभीर दुखापत करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांवर अत्याचार

तृणमूल काँग्रेसचे लोक घरात घुसतात. एखादी स्त्री सुंदर दिसली तर ते तिला सोबत घेऊन जातात. तिच्यावर अनेक दिवस बलात्कार होतो आणि नंतर तिला सोडून देतात, असा आरोप अनेक महिलांनी काही दिवसांपर्वीच केला होता. या अत्याचाराविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता. शेख शाहजहान हा मुख्य आरोपी असून त्याच्या अटकेची मागणीही या महिलांनी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा – Maharashtra Politics : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना सुनावले, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -