घरमहाराष्ट्रNana Patekar : देशात कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा, नाना पाटेकरांचा शेतकऱ्यांना...

Nana Patekar : देशात कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा, नाना पाटेकरांचा शेतकऱ्यांना सल्ला

Subscribe

नाशिक : किमान आधारभूत किमतीसह (एमएसपी) विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सरकारकडे शेतकऱ्यांकडे काही मागू नये, देशात कोणाचे सरकार आणायचे हे ठरवा, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यासोबतच त्यांनी राजकारणातील प्रवेशाबाबतही उत्तर दिले आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आंबेडकरांना विश्वासच नाही, पत्रातून भूमिका स्पष्ट

- Advertisement -

शेती अर्थ प्रबोधिनीतर्फे मोहाडी येथे दोन दिवसीय 11वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे अध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन सोमवारी नाना पाटेकर यांनी केले. सोने 16 रुपये तोळा होते, असे माझी आई सांगायची, पण आता ते 50 हजार रुपयांवर पोहोचले आहे. देशात सोन्याचे दर दररोज वाढत असताना गहू-तांदळाचे भाव का वाढत नाहीत? पूर्वी 80 ते 90 टक्के शेतकरी होते, आता 50 टक्के शेतकरी आहेत. देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मरू नये आणि अच्छे दिनची वाटही पाहू नये. जिद्दीने चांगले दिवस आणावेत. सरकारकडे काहीही न मागता, कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा, असे नाना पाटेकर म्हणाले.

हेही वाचा – Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडून लोकल प्रवाशांचे हाल दाखविणारा व्हिडीओ शेअर, वाचा काय आहे प्रकरण?

- Advertisement -

मी राजकारणात जाऊ शकत नाही कारण माझ्या पोटात जे असते तेच ओठावर येईल. त्यामुळे ते माझी पक्षातून हकालपट्टी करतील. पक्ष बदलत-बदलत महिनाभरात सर्व पक्ष संपुष्टात येतील. त्यामुळे मी राजकारणात जाऊ शकत नाही. इथे आम्ही तुमच्यासमोर म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो. आपल्याला रोज जेवायला देणाऱ्याची जर कोणी पर्वा करत नाही, तर आम्ही तुमची (सरकारची) का पर्वा करायची? अशी टिप्पणी त्यांनी केली.

काहीही झाले तरी शेतकरी कधीच कोणाची अडवणूक करणार नाही. आत्महत्या केली तरी परत जन्मून मी शेतकरीच होणार अशी जात आहे. मला शेतकऱ्याचा जन्म नको, असे शेतकरी कधीच म्हणणार नाही, असे सांगून, जनावरांची भाषा जर आम्हाला येत असेल तर, तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांची भाषा समजत नाही का? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी केला.

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याची हिम्मत कशी झाली? राऊतांची खोचक टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -