घरताज्या घडामोडीसॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक : प्रकाश जावडेकर

सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक : प्रकाश जावडेकर

Subscribe

देशांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढला असून त्याचबरोबर त्यांच्या विल्हेवाटीसाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही तर जानेवारी 2021 पासून तो सर्वांना बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी केली आहे. कचरा वेचक संघटनेला स्वच्छता सेविका संघटना म्हटले पाहिजे कारण त्या देशाची खूप मोठी सेवा करत आहेत असे प्रतिपादन पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थे द्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी त्यांनी स्वच्छता सेविकांची संवाद साधला.

शैक्षणिक संस्था, हाउसिंग कॉलनी यांनी आपल्या परिसरातच कचरा जिरवला पाहिजे. नगर परिषद असलेल्या शहरांना कचरा व्यवस्थापनाची सक्ती आहे परंतु यापुढे 3000 पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. महिलांमध्ये सातत्य, दया, धैर्य आणि निर्णयक्षमता असे चार महत्त्वाचे गुणधर्म असतात. आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनी मी इथे जमलेल्या स्वच्छता सेविकांना नमन करतो ज्या आपल्या स्वच्छ,, निरोगी, हिट आणि फिट भारताचे स्वप्न साकार करायला मदत करतील असे जावडेकर म्हणाले.

- Advertisement -

3500 स्वच्छता सेविकांचे प्रतिनिधित्व करत श्रीमती राणी शिवशरण यावेळी म्हणाल्या की कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र जागा मिळाल्यास स्वच्छता सेविकांना खूप फायद्याचे ठरेल तसेच व्ही कलेक्ट सारखे उपक्रम आम्हाला घरांमधील निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळवायला मदत करतात. स्वच्छ संघटनेच्या संस्थापिका लक्ष्मीनारायण याप्रसंगी म्हणाल्या की कचऱ्याची विल्हेवाट ही विकेंद्रित पद्धतीने लाभली पाहिजे कचऱ्याच्या वाहतुकीसाठी खर्च होणारा पैसा तो कचरा आसपासच्या परिसरातच जिरवण्यासाठी व त्यातून खत निर्मितीसाठी वापरला गेला पाहिजे तसेच टाकाऊ प्लास्टिक विकत घेणाऱ्या कंपन्यांचे प्लांट जर पुण्यातच असतील तर ते खुप मदतीचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -