घरताज्या घडामोडीतुम्हांलाही अशी स्वप्न पडतात का?

तुम्हांलाही अशी स्वप्न पडतात का?

Subscribe

‘मनी वसे तेच स्वप्नी दिसे’ असे म्हणतात. म्हणजेच ज्या वस्तूचा, व्यक्तीचा, प्राण्यांचा, फुला -पानांचा आपण विचार करतो तेच किंवा त्याच्याशी संबधित स्वप्न आपल्याला पडतात. असे म्हटले जाते. त्यातही पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरते असाही समज आहे. आज याच स्वप्नांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साधारणत स्वप्न दोन प्रकारची असतात. आपण गाढ झोपेत असताना पडणारे स्वप्न व कधी कधी भविष्याचा विचार करता करता झोप लागल्यानंतर पडलेले स्वप्न. यातील पहीले हे सहसा विचारांमुळे येते. अनेकवेळा आपले त्या दिवसाचे काम किंवा एखाद्याची भेट घेणे राहते. त्यामुळे मनाला रुखरुख असते. अशा वेळी त्या संबंधित व्यक्तीबदद्ल विचार करता करता आपल्याला झोप लागते. पण स्वप्नात मात्र आपण भलत्याच व्यक्तीला बघतो. ज्याला आपण कधी बघितलेलेही नसते. त्यामुळे जाग आल्यावर आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा सहसा आठवत नाही. पण स्वप्न मात्र आठवत राहते. दुसरे स्वप्न प्राणी , पाणी, समुद्र, खड्डा, विहीर , नदी , झाडे यांच्याबद्दल पडते. या वस्तू डोळ्यासमोर येतात. कधी कधी मृत व्यक्तीही स्वप्नात दिसतात. कारण कुठे ना कुठे त्या व्यक्ती आपल्याशी संबंधित असतात. त्यांच्याशी आपले भावनिक नाते असते. त्यांचे जाणे मनाला डिवचणारे असते. पण काळानुसार त्यांच्या आठवणीही धूसर होत जातात. मात्र मेंदूच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांची आठवण आपणच ब्लॉक केलेली असते. यामुळे कधी कळत नकळत त्या आठवणींचे तरंग मनात उमटतात आणि स्वप्नात गेलेल्या व्यक्ती दिसू लागतात. पुढच्या काही दिवस कधी त्या सतत दिसतात तर कधी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आपल्याला भास होतो. खरं तर त्या व्यक्तींबरोबर आपलंच बोलणं राहीलेले असते. ती मनात सल असते. यामुळे स्वप्नात ते आपल्याशी बोलत असल्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचा आपल्याला भास होतो.
त्या बऱ्याचवेळी मनात विचार नसतानासुद्धा एखादी व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसते. कारण आपण कळत नकळत प्रसंगानुरूप त्यांची आठवण काढत असतो.

- Advertisement -

त््यातही जर स्वप्नात प्राणी येत असतील तर त्याचा अर्थ काय हे बघूया
कुत्रा- स्वप्नात रडणारा कुत्रा दिसणे म्हणजे अशुभ संदेश. तर नुसताच कुत्रा दिसणे म्हणजे जुने मित्र भेटणे.
मांजर- स्वप्नात मांजर येणे म्हणजे वाद होण्याची शक्यता.
सिंह- सिंह हा जंगलाचा राजा. त्याचे स्वप्नात दर्शन म्हणजे तुमचा विजय.
कोकरू- स्वप्नात कोकरू दिसणे म्हणजे आत्मविश्वास वाढणे.
उंट- चालणारा उंट म्हणजे आजारपण
गाय- सफेद गाय स्वप्नात दिसली की व्यवसायात लाभ होतो.
काळा नाग- काळा नाग दिसणे म्हणजे धनलाभ
मासे- मासा हे लक्ष्मीचा संदेशवाहक. म्हणजे धनलाभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -