घरदेश-विदेशSatyapal Malik : कोणी वाकत नसेल तर त्यांना..., एनसीपीच्या शरद पवार गटाची...

Satyapal Malik : कोणी वाकत नसेल तर त्यांना…, एनसीपीच्या शरद पवार गटाची टीका

Subscribe

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले. यावरून, ईडी-सीबीआय हुकुमशाहीचे नवे तंत्र म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – CBI Raids on Satyapal Malik: सत्यपाल मलिकांच्या घरासह 30 ठिकाणांवर CBI ची छापेमारी, काय आहे प्रकरण?

- Advertisement -

देशासाठी अत्यंत संवेदनशील अशा पुलवामा घटनेत केंद्र सरकारचाच हात आहे, हे दाखवून देणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयावर आज, गुरुवारी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला. कोणी वाकत नसेल तर त्यांना जमेल त्या मार्गाने घाबरवण्याचे काम हे हुकुमशाही सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. केंद्र सरकारची ही सर्व काळी कृत्ये लोकांना कळतही आहेत आणि त्याबद्दल त्यांना रागही आहे. हा संताप लोक येत्या निवडणूकीत दाखवतील, असा विश्वासही शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

छापेमारी कशासाठी?

किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित नागरी कामांच्या वाटपात ई-टेंडरिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही, असा सत्यपाल मलिक यांच्यावर आरोप आहे. CVPPPLच्या 47व्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिव्हर्स ऑक्शनिंगसह ई-टेंडरिंगद्वारे पुन्हा कंत्राट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोपही आहे. सत्यपाल मलिक यांचे माजी प्रेस सेक्रेटरीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

हेही वाचा – Farmers Protest : शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे सोशल मीडिया अकाउंट होणार बंद; वाचा सविस्तर

मोदी सरकावर केली होती टीका

सत्यपाल मलिक यांनी गेल्यावर्षी द व्हायरल या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोदी सरकारबाबत खळबळजनक वक्तव्य केले होते. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. तसेच, पुलवामामध्ये सीआरपीएफच्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमाने दिली नाहीत, ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा दावा देखील मलिक यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. मलिक यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर काँग्रेसने देखील केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

हेही वाचा – Nana Patole : आतंकवादी असल्याप्रमाणे शेतकऱ्यांवर गोळीबार काय करता?; पटोले यांचा संतप्त सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -