घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रEknath Khadse : लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

Eknath Khadse : लोकसभेपूर्वी एकनाथ खडसे स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

Subscribe

2014 नंतर केंद्रासह राज्यात भाजपचे सत्ता प्रस्थापित झाली. मात्र, याचदरम्यान भाजपमध्ये मोठी घडामोड घडली. केंद्रातील भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर नाराज एकनाथ खडसेंविरोधात एक नव्हे तर अनेक आरोप झाले.

मुंबई : भाजप सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) सामील झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. ती चर्चा म्हणजे एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वगृही म्हणजे भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. याबाबत त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Eknath Khadse Will Nath Bhai return home before the Lok Sabha Inviting discussions)

2014 नंतर केंद्रासह राज्यात भाजपचे सत्ता प्रस्थापित झाली. मात्र, याचदरम्यान भाजपमध्ये मोठी घडामोड घडली. केंद्रातील भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर नाराज एकनाथ खडसेंविरोधात एक नव्हे तर अनेक आरोप झाले. त्यानंतर एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या नेतृत्त्वात काम करणं पसंत करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता तेच एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

- Advertisement -

अनेकांची इच्छा आहे की त्यांनी भाजपमध्ये यावं

एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना त्या म्हणाल्या की, मागील अनेक दिवसांपासून हे चित्र आहे की, अन्य पक्षातील बडे नेते भाजपामध्ये येत आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, कारण तो वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पक्ष काय निर्णय घेतो, नाथाभाऊंचे त्यावर काय मत आहे, हे घडल्यानंतर सर्वांना समजेल. मात्र, नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून बरेच लोकांचीही ही इच्छा आहे की, नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीत येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : “माझा टिश्यू पेपर म्हणून वापर”, ‘या’ महिला प्रवक्त्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

- Advertisement -

गिरीश महाजनांनी काढला चिमटा

भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंना डिवचलं. तेम्हणाले की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत. मला वाटते की, त्यांना पुन्हा भाजपामध्ये घेण्याचे तसे काही प्रयोजन नाही. अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल मला विचारलेले नाही. मी लहान कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांनी थेट वरुन हॉटलाइन असेल तर त्यांनी लावावी अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजांनी एकनाथ खडसेंना चिमटा काढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -