घरताज्या घडामोडीSBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' सेवांसाठी बँक आकारणार अतिरिक्त शुल्क

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ सेवांसाठी बँक आकारणार अतिरिक्त शुल्क

Subscribe

सेव्हिंग अकाऊंटसाठी १ जुलैपासून २०२१ पासून नवीन सेवा शुक्ल लागू

भारतीय स्टेट बँकने (SBI) ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. SBIच्या बचत खातेधारकांसाठी विविध प्रकारच्या बँकिंग सेवांमध्ये बदल करण्याचा निर्णय SBIने घेतला आहे. सेव्हिंग अकाऊंटसाठी १ जुलैपासून २०२१ पासून नवीन सेवा शुक्ल लागू केले जाणार आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार,नवीन शुल्क ATMमधून पैसे काढणे, नवीन चेकबुक,मनी ट्रान्सफर आणि इतर आर्थिक व्यवहारांवर लागू असणार आहे. एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट फीचे नवीन दर काय असतील हे येत्या काळात कळवले जाईल,असे सांगण्यात आले आहे.

SBIच्या बेसिक सेव्हिंग अकाऊंटवर वैध KYC सादर करुन कोणत्याही व्यक्तीद्वारे उघडता येते. त्या खात्यात किमान शिल्लक शून्य ठेवता येते. त्यात जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. काही पैसे एटीएमसोबत डेबिट कार्डही बेसिक सेव्हिंग बँक डिपॉसिटच्या खातेधारकांना देण्यात आले आहे. ATMमधून चार वेळा पैसे काढण्याल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतर कोणत्याही शाखा आणि ATMमधून पैसे काढल्यास त्यावर शुल्क आकारले जातील, असे SBIने स्पष्ट केले आहे. दरवेळेस ATMमधून पैसे काढल्यास १५ रुपये द्यावे लागतील त्यावर GSTदेखिल आकारण्यात येईल.

- Advertisement -

SBIच्या खातेधारकांना आर्थिक वर्षात १० पानांचे चेकबुक मोफत देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा १० पानांचे चेकबुक हवे असल्यास त्यासाठी ४० रुपये मोजावे लागतील. त्यात GSTदेखिल भरावा लागेल. त्याचप्रमाणे २५ पानांच्या चेकबुकसाठी ७५ रुपये आणि GSTआकारण्यात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांना नवीन चेकबुकसाठी शुल्क आकारण्यात येणार नाहीत.ज्येष्ठ नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे.


हेही वाचा – PMSBY Scheme: १२ रुपये गुंतवा, अन् मिळवा २ लाखांच्या सुरक्षेचा विमा

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -