घरताज्या घडामोडीPMSBY Scheme: १२ रुपये गुंतवा, अन् मिळवा २ लाखांच्या सुरक्षेचा विमा

PMSBY Scheme: १२ रुपये गुंतवा, अन् मिळवा २ लाखांच्या सुरक्षेचा विमा

Subscribe

१८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती कोणत्याही बँक खात्यासह अपघाती विमा योजनेसाठी नोंदणी करु शकतात.

२०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY Scheme) ही सामाजिक सुरक्षा योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत अपघात आलेल्या किंवा अपंगत्वासाठी विमा देण्यात येतो. अपघाती मृत्यू आणि संपूर्णपणे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला २ लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. तर थोड्या प्रमाणात अपंगत्व आले असल्यास १ लाखांपर्यंत विमा मिळतो. त्याचप्रमाणे ह्यदयविकाराचा झटका यासारख्या नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंदही या योजनेत केली जाणार आहे. त्यासाठी केवळ १२ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. (PMSBY Scheme: Invest Rs 12 and get Rs 2 lakh security insurance)  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केवळ एक वर्षाची विमा योजना आहे. जो वार्षिक प्रिमियम जीएसटी सह १२ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती कोणत्याही बँक खात्यासह अपघाती विमा योजनेसाठी नोंदणी करु शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत? जाणून घ्या

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी बँकेत अर्ज सादर करावा लागेल. बँकेच्या नेट बँकिंगवर लॉग इन केल्यानंतर त्यात वैयक्तिक माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, बँक बुक,वयाचा दाखला, मोबाईल नंबर,फोटो,इनकम सर्टिफिकेट या कागदपत्रांची आवश्यकता आहे. बँकेत फॉर्म भरत असताना मृत्यू प्रमाणपत्र किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशननंतर विम्याची रक्कम लाभार्थ्यांसाठी दिली जाते.

- Advertisement -

प्रधानमंत्री सुरक्ष विमा योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यांचा वार्षिक प्रीमियम वजा करण्यासाठी बँकेकडून सूचना पाठवण्यात येत आहेत. रक्कम खात्यातून स्वयम डेबिट केली जाईल आणि त्याची माहिती smsद्वारे देण्यात येईल. ज्यांना सुरक्षा विमा सुरु ठेवायचा आहे त्यांना मे महिन्यात प्रीमियम भरावा लागणार आहे.


हेही वाचा – Covid-19 India Update: लहान मुलांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम होणार नाही, AIIMSच्या डॉ. रणदीप गुलेरियांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -