घरअर्थसंकल्प २०२२Union Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच SBIने वाढवले FDच्या ठेवींवरील...

Union Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच SBIने वाढवले FDच्या ठेवींवरील व्याज, जाणून घ्या

Subscribe

देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन जाहीर करणार आहे. परंतु बजेट २०२२ च्या एकदिवसाआधीच शेअर बाजाराने उसळली घेतल्यानंतर आता SBIबँकेकडून एफडीच्या ठेवींवरील व्याज वाढवण्यात आले आहेत. सर्वात जास्त वाढ एसबीआय बँकेने आपल्या दरात केली आहे. याशिवाय RDच्या स्किममध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. बँकेकडून सार्ट टर्म आणि लॉन्ग टर्मच्या फिक्स डिपॉझिटवरील दरात वाढ केली आहे.

SBIकडून फिक्स डिपॉझिट स्कीम

देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या वेबसाईटवर घोषणा करत २ कोटी रूपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर वाढीवर नवीन व्याजदराचा लाभ लोकांना दिला जाणार आहे. दर वाढीचा फायदा २२ जानेवारी २०२२ पासून ग्राहकांना मिळणार आहे.
बँकेने गुंतवणुकीवरील दर ७ दिवसांवरून १० वर्षांपर्यंत वाढवला आहे. काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बँक, एचडीएफडी बँक आणि कॅनरा बँकेनेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

- Advertisement -

FDच्या दरात नव्याने वाढ

७ ते ४५ या दिवशी सर्वांसाठी २.९ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.४ टक्के इतकं आहे. तर ४६ ते १७९ दिवसांसाठी ३.९ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. २११ दिवस एक वर्षासाठी ४.४० ते ४.९ टक्के व्याज देण्यात येणार आहे. तर १ वर्षापासून ते २ वर्षांपर्यंत सर्वांसाठी ५.१० टक्के ते ५.६० टक्के इतकं व्याज दर वाढवण्यात येणार आहे.

RDच्या गुंतवणूकीवर व्याजाची वाढ

आरडी वर ५.१ टक्क्यांनी वाढून ५.४ टक्के इतकं करण्यात आलंय. तर जेष्ठ नागरिकांसाठी ५० पॉइंटने वाढ करण्यात आली आहे. आरडीच्या दरावर १५ जानेवारीपासून वाढ करण्यात येणार आहे. तर स्कीमच्या माध्यमातून १०० रूपयांचं खातं ओपन करून १० रूपयांची गुंतवणूक करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा : अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहिम उपयुक्त ठरणार – राजेश टोपे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -