घरट्रेंडिंगव्वा, प्रश्न आवडला नाही, म्हणून तिने उत्तरच लिहिलं नाही!

व्वा, प्रश्न आवडला नाही, म्हणून तिने उत्तरच लिहिलं नाही!

Subscribe

गणिताच्या पेपरमध्ये आलेलं गणित अपमानकारक वाटलं, म्हणून एका चौथीच्या मुलीने चक्क त्याचं उत्तरच लिहिलं नाही. पर हे गणित अपमानकारक असल्याचं देखील लिहून टाकलं.

परीक्षेमध्ये आपल्याला कुठला प्रश्न आवडला नाही, तर आपण काय करतो? आता त्या प्रश्नामधून मार्क मिळणार आहेत, म्हणून आपण न आवडूनही त्या प्रश्नाचं उत्तर लिहितो. पण एका चौथीच्या मुलीने चक्क प्रश्न आवडला नाही म्हणून थेट त्या प्रश्नाचं उत्तरच लिहिलं नाहीये. आणि हे त्या मुलीनेच सांगितलं आहे. आणि तेही चक्क पेपरमध्येच! या मुलीने उत्तर पत्रिकेतच आपली नापसंती लिहून टाकली. ‘मला हा प्रश्न आवडला नाही. त्यामुळे मी याचं उत्तर देणार नाही’, असं या मुलीने तिथे लिहिलं आहे. हा प्रकार अमेरिकेतील उटाह या राज्यात ही १० वर्षांची मुलगी राहात असली तरी तिने दिलेल्या भन्नाट उत्तरावर जगभरातले नेटिझन्स फिदा झाले आहेत!

‘हा प्रश्न अपमान करणारा आहे’

ऱ्हिदम पकाको असं या मुलीचं नावं आहे. मुरे भागातल्या ग्रँट एलिमेंटरी स्कूलमध्ये ती शिकते. तिला गणिताच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला होता. ‘शेजारच्या तक्त्यामध्ये चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचं वजन दिलं आहे. त्यातली सर्वात जास्त वजनाची मुलगी सर्वात कमी वजनाच्या मुलीपेक्षा किती जड आहे?’ असा तो प्रश्न होता. पण हा प्रश्न ऱ्हिदमला आवडला नाही. तिने तिचा रोष तिथेच व्यक्त करून टाकला. ‘हा प्रश्न अपमान करणारा आहे. मला माफ करा. पण मी या प्रश्नाचं उत्तर लिहिणार नाही. हे वाईट आहे’, असं तिने लिहिलं. तिच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही, तर तिने नंतर तिच्या शिक्षकांना पत्र लिहून देखील आपला राग व्यक्त केला. ‘मला रूक्ष वागायचं नाही. पण मला वाटत नाही की ते गणित चांगलं होतं. तो प्रश्न लोकांना जज करत होता’, असं तिने या पत्रात लिहिलं आहे.

- Advertisement -

आता तिचं हे उत्तर समोर आल्यानंतर नेटिझन्स ट्वीटरवर फुल्ल ऑन कॉमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -