घरदेश-विदेशशेअर बाजार भांडवलात १ लाख कोटींची घसरण

शेअर बाजार भांडवलात १ लाख कोटींची घसरण

Subscribe

अदानी समूहाला ७३ हजार कोटींचे नुकसान, एन्टरप्राझजेसचा शेअर २० टक्क्यांनी, पोर्ट्सचा शेअरमध्ये ८.५ टक्क्यांची घसरण

अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३५०० कोटी रुपयांची गुंतणवूक करणार्‍या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त सोमवारी पसरले. त्यामुळे शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. गुंतवणूकदारांनी तातडीने अदानी समूहातील शेअर्स विकण्यास सुरुवात केली. त्याचा मोठा फटाका अदानी समूहाला बसला. तासभरात अदानी समूहाचे ७३ हजार कोटी रुपयांची मोठे नुकसान झाले.

मागील वर्षभर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ होत होती. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत होते. सोमवारी मात्र त्याला ब्रेक लागला. सोमवारच्या पडझडीमुळे अदानी समूहाच्या बाजार भांडवलात देखील आज प्रचंड घट झाली आहे. शुक्रवारी अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल 9.5 लाख कोटी होते. त्यात सोमवारी एक लाख कोटींची घसरण झाली आहे.

- Advertisement -

अदानी समूहात गुंतवणूक करणार्‍या फंडची खाती गोठवल्याचे वृत्त सोमवारी शेअर बाजारात धडकल्यानंतर गुंतणूकदारांनी अदानी समूहातील शेअरची चौफेर विक्री सुरू केली. ज्यामुळे अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर 20 टक्क्यांनी कोसळला होता. तसेच अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅस यांच्यात 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि तिन्ही शेअरने नीचांक गाठला. यामुळे या शेअरची आणखी पडझड थांबली.

अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर दिवसभरात 25 टक्क्यांपर्यंत कोसळला होता. मात्र, त्यानंतर तो सावरला आणि 6.25 टक्क्यांच्या घसरणीसह 1501 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्सचा शेअर 8.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.अदानी समूहाबाबत आलेल्या वृत्तानंतर या समूहातील शेअरबाबत किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा सल्ला शेअर बाजार विश्लेषकांनी दिला आहे. सध्या अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात चढ -उतार दिसून येईल. तशी अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, त्यातही काही गुंतवणूकदारांना संधी दिसत आहे.

- Advertisement -

गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक, निफ्टीही खाली गेला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. अदानी समूहातील कंपन्यांसोबतच धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -