घरदेश-विदेशजे नको ते मतदारांनीच नकारले - उद्धव ठाकरे

जे नको ते मतदारांनीच नकारले – उद्धव ठाकरे

Subscribe

चार राज्याच्या निवडणुकींचा निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही पर्वा न करता मतदारांनी मत केले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

“पर्याय कोण? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यांतील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या निर्भिडतेचे मी अभिनंदन करतो.” अशा प्रखर शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालावर ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण निकालावर आपले मत मांडले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

“निवडणुकीत हार-जित होतच असते. पण चार राज्यांमध्ये परिवर्तन घडवणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ते ईव्हीएम, पैसेवाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे काय ते पुढे बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेली ही दिशा आहे. त्या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो” – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

- Advertisement -

काँग्रेसने दिली तगडी टक्कर

चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाची १५ वर्षापासूनी काँग्रेसची सत्ता उखडून टाकण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. तर राजस्थानमध्येही काँग्रेस आघाडीवर आहे. तर मध्यप्रदेशही काँग्रेसने भाजपला टक्कर दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उठवल्या जाते आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -