घरदेश-विदेशबापरे! बलात्काराचा व्हिडिओ तिनेच दाखवला पोलिसांना

बापरे! बलात्काराचा व्हिडिओ तिनेच दाखवला पोलिसांना

Subscribe

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे की ज्याची सहसा कुणी कल्पनाही करु शकणार नाही. मेरठ येथील एक महिला तिच्यावर झालेल्या सामुहिक बलात्काराचा व्हिडिओ घेऊन स्वत:च पोलीस ठाण्यात गेली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी करु लागली. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही काही काळ भांबावून गेले.  याप्रकरणी नेमकं काय करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. दरम्यान, आपल्यावरील सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करत नाही, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी ३ लोकांनी मिळून तिच्यावर मेरठमध्ये सामुहिक बलात्कार केला. बलात्कार करतेवेळी आरोपींनी तिचा व्हिडिओही बनवला. पोलिसांकडे गेलीस तर तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींनी पिडीतेला दिली होती.

पीडितेच्या धैर्याला सलाम

मात्र, या धमकीला डावलून धैर्य दाखवत पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आणि आरोपींना अटक करा अशी मागणी केली. पीडिता पोलिसात गेल्याचं समजताच आरोपींनी तिच्यावरील सामुहिक बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपी पीडितेला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. तसंच समाजात तुला बदनाम करु असंही वारंवार सांगत राहिले. मात्र, ‘माझ्यासोबत जे झालं आहे ते आता काही केलं तरी बदलू शकणरा नाही, मग अशावेळी मी किमान आरोपींना तरी शिक्षा देऊ शकते’, या भावनेतून मी पोलिसात धाव घेतल्याचं पीडितेने सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला आरोपी अनीस अन्सारी, शादाब आणि फरियाद या तिघांविरोधात FRI दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पीडितेच्या इच्छेनुसार ही केस क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -