घरदेश-विदेशहिमाचल प्रदेशमध्ये ऋतूतील पहिली बर्फवृष्टी!

हिमाचल प्रदेशमध्ये ऋतूतील पहिली बर्फवृष्टी!

Subscribe

हिमाचल प्रदेशमधील काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे तेथील वातावरण आल्हाददायी झाले आहे. काही भागांमध्ये ही यंदाच्या सीजनमधील पहिली बर्फवृष्टी आहे.

हिमाचल प्रदेशमधील काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे तेथील वातावरण आल्हाददायी झाले आहे. काही भागांमध्ये ही यंदाच्या सीजनमधील पहिली बर्फवृष्टी आहे. या ठिकाणी सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांना सुंदर दृश्यांची पर्वणी मिळत आहे. बर्फवृष्टी होत असल्याचे समजताच मनाली आणि आसपासच्या परिसरात पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमधील मनाली आणि नारकंडामध्ये गेल्या रात्री मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून दोनही ठिकाणी यावर्षीची पहिली बर्फवृष्टी आहे. शिवाय धर्मशाळा आणि पालमपूरमध्येही बर्फ पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर शिमला, कुफरी, धर्मशाळा, नाहन, चंबा आणि मंडीसारख्या इतर हिल स्टेशन्सवर काही प्रमाणात पावसांच्या सरीदेखील बरसल्या.

- Advertisement -


वेधशाळेने सांगितले की, पर्यटन रिसॉर्ट मनालीतील कमीत कमी तापमान शून्य ते १.२ डिग्री सेल्सियसच्याही खाली आले आहे. तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरात मध्यम स्वरूपातील बर्फवृष्टी होत आहे

वाचा : पंजाबला ‘हाय अलर्ट’चा इशारा

वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये पसरली बर्फाची चादर

वाचा : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा आणि बर्फवृष्टीचा कहर; १४ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -