घरदेश-विदेशचिकनसाठी आईचा खून

चिकनसाठी आईचा खून

Subscribe

पैसा, धन, दौलत, इस्टेट याकरता सख्ख्या नात्याचा देखील विचार केला जात नाही. मात्र फक्त चिकनच्या लालसेपोटी एका नराधमानं सख्ख्या आईचाच खून केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये घडली आहे. चिकन बनवायला सांगूनही आईनं न बनवल्याच्या रागातून दारुच्या नशेत असलेल्या ४५ वर्षांच्या मुलाने ८० वर्षाच्या वयस्कर आईचा खून केला. या घटनेमुळे गुंटूरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किशोर बेजम (४५) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून फारार आरोपीचा शोध सुरू आहे.

नक्की घडलं काय?

- Advertisement -

गुंटूरमध्ये किशोर बेजम आपल्या आईसोबत राहात होता. रविवारी त्याला चिकन खायचं होतं. त्यासाठी त्यानं चिकन आणून आईला बनवायला सांगितलं आणि तो दारू पिऊन आला. दारूच्या नशेत त्याने आईला चिकन बनवलं का? अशी विचारणा केली. पण आईनं चिकन बनवलं नसल्याचं सांगितलं. ते ऐकताच किशोरनं लागलीच चाकूने आईवर सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. आई बेजम मरियम्मा (८०) यांच्या जोरदार किंकाळीने शेजारी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी किशोर बेजम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

दारूच्या व्यसनामुळे पत्नीनंही किशोरला सोडलं

- Advertisement -

किशोरला दारुचं प्रचंड व्यसन आहे. तो दारु पिऊन त्याच्या पत्नीलाही त्रास द्यायचा. त्याच्या या वागण्यामुळे किशोरची पत्नी प्रचंड हैराण झाली होती. अखेर तिनं किशोरला सोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी ती आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर तो एकटा आईसोबत रहात होता.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -