घरदेश-विदेशजगन्नाथ पुरी मंदीरातील खजिन्याची चावी हरवली;

जगन्नाथ पुरी मंदीरातील खजिन्याची चावी हरवली;

Subscribe

ओडिशा राज्यात खळबळ

ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिरातील रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली असल्याची माहिती समोर आल्यामुळे ओडिशा राज्यात एकच खळबळ माजली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरी येथील जगन्नाथ मंदिरात ४ एप्रिल रोजी एक चौकशी समिती आली होती. तब्बल ३४ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिरातील खजिन्याचे दरवाजे उघडले गेले होते. मात्र त्यानंतर ही चावी गायब आहे. मंदिर प्रबंधक, तसेच कोषागारालाही या चावीसंदर्भात कोणतीही माहिती नाही, असंही जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीने सांगितले आहे.

चावी हरवल्याचे कळल्यापासून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या प्रकारानंतर ओडिशा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच भाजपा सरकारनेही या प्रकारानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ओडिशातील भाजप प्रवक्ते पीतांबर आचार्य म्हणाले की, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जगन्नाथ मंदिरातल्या रहस्यमयी खजिन्याची चावी गायब झाल्याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. दरम्यान पटनायक यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

खजिना लुटण्याचा प्रयत्न
५० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या या मंदिराची एकूण मालमत्ता २५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. १२ व्या शतकापासून आतापर्यंत १८ वेळा जगन्नाथ मंदिरातील खजिना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु अद्याप कोणालाही हा खजिना लुटण्यात यश आलेलं नाही. जगन्नाथ मंदिरात ७ कक्ष असून, यातील मंदिराचे फक्त ३ दरवाजे भाविकांसाठी कायम खुले असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -