घरदेश-विदेश'त्या' माजी जवानाला मोदींविरोधात सपाची उमेदवारी

‘त्या’ माजी जवानाला मोदींविरोधात सपाची उमेदवारी

Subscribe

बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा व्हीडीओ व्हायरल केल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेज बहादूर यांच नाव चर्चेत आलं होतं.

बीएसएफ जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून सरकारवर टीका केल्यामुळे बडचर्फ करण्यात आलेला माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव हा येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहे. यादव हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते. पण आता सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा व्हीडीओ व्हायरल केल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेज बहादूर यांच नाव चर्चेत आलं होतं.

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी  समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. तेज बहादूर यादव हे मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून  निवडणूक लढवणार आहे.

- Advertisement -

सुरक्षा दलतील भ्रष्टाचार संपवण्याच्या इराद्याने मी निवडणूक लढवणार आहे. मी सेवेत असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. पण मला बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे ही निवडणूक मोदींविरोधात लढवणार असल्याचं तेज बहादूर यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं.

म्हणून झाली होती तेज बहादूर यांच्यावर निलंबनाची कारवाई

तेज बहादूर यादव यांनी फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत बीएसएफच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवण सगळ्यांसमोर आणलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकषीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -