घरदेश-विदेशनवमतदार अर्जुन सारासह केले सचिन तेंडुलकरने मतदान

नवमतदार अर्जुन सारासह केले सचिन तेंडुलकरने मतदान

Subscribe

यंदाच्या मतदान प्रक्रियेत सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.

१७व्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज १७ लोकसभेच्या जागेवर होत आहे. या दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या संपुर्ण परिवारासह आज मतदान केले. यंदाच्या मतदान प्रक्रियेत सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सचिनसह त्याची पत्नी अंजलीही उपस्थित होती. मतदान केल्यानंतर सचिनने सगळ्यांनी मतदान करायलाच हवे. हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आपल्या देशासाठी हे कर्तव्य बजावायलाच हवे, असा संदेशही मतदारांना दिला.

- Advertisement -

सचिनने मतदानाचे आपले फोटोस सोशल मीडियावर शेअर केले. मतदानापुर्वी सचिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला.

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमी सामाजिक भान राखण्यासाठी कायम अग्रेसर असतो. काही दिवसांपूर्वीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना मतदान कराच असा संदेश दिला होता. आजही सचिनने मतदान करा, असा आग्रहाचा संदेश देणारा व्हिडीओ ट्विट केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -