घरदेश-विदेशमुलांचं व्यंग दूर व्हावं म्हणून आई-वडिलांनी जमिनीत पुरलं

मुलांचं व्यंग दूर व्हावं म्हणून आई-वडिलांनी जमिनीत पुरलं

Subscribe

आज या वर्षातील सर्वात शेवटचं सुर्यग्रहण होतं. देशभरातील लोकांनी हे सुर्यग्रहण पाहिलं. आजचं सुर्यग्रहण हे कंकणाकृती सुर्यग्रहण होतं. सुर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण विषयी देशात विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. देशभरात अनेक लोकांकडून आणि खगोलशास्त्रांकडून हे सुर्यग्रहण पाहिलं गेलं. मात्र, अजूनही भारतातील काही भागांमध्ये अंधश्रद्धा बघायला मिळाली. कर्नाटकमध्ये सुर्यग्रहण दरम्यान काही पालकांनी आपल्या विशेष मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरलं. ग्रहण काळात अशाप्रकारं मुलांना पुरलं तर त्यांच्यातील व्यंग दूर होतो, असा गैरसमज या भागातील पालकांचा आहे.

कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यामधील ताजसुल्तानपूर या गावात अशाप्रकारचं कृत्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अनेकांकडून या घटनेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, ग्रहण संदर्भात देशात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. बऱ्याच अंधश्रद्धा देखील आहेत. या काळात काही भागांमध्ये अन्न शिजवलं जात नाही. याशिवाय जे अन्न आहे त्यावर तुळसीचं पान ठेवलं जातं. त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रहण काळात गरोदर महिलेला घरच्यांकडून कोणत्याही प्रकारची कामं करण्यास मनाई केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -