घरताज्या घडामोडीभारतीय युझर्ससाठी गुगलकडून खास फीचर्स; इंटरनेटचा वापरही होणार सोपा, जाणून घ्या

भारतीय युझर्ससाठी गुगलकडून खास फीचर्स; इंटरनेटचा वापरही होणार सोपा, जाणून घ्या

Subscribe

गुगल फॉर इंडिया इव्हेन्ट कंपनीने नव्या प्रकारचे फीचर्स लॉन्च केले आहेत. यामुळे भारतीयांना इंटरनेट युझर्सचा वापर अगदी सोपा मार्गाने जलद होणार आहे. तसेच ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाही प्रोत्साहन देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच गुगल पेमध्येही सेफ्टी फिचर्स लॉन्च केले जाणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचई म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनंही सर्व सेक्टरमध्ये उपयुक्तता सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ऑफर केल्या जाणाऱ्या भाषांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडलवर सध्या पावरफुल पद्धतीने काम केलं जात आहे. यामध्ये जवळपास एक हजार भाषांना सपोर्ट देण्यात आला आहे. गुगल सर्च केल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मल्टी मॉडल व्ह्यू सुद्धा मिळणार आहे.

- Advertisement -

गुगलच्या मल्टी फिचर्समधून यूझर्स इमेज आणि टेक्टला एकाचवेळी सर्च करु शकतात. कंपनीने येत्या काळात जास्तीत जास्त भाषा लॉन्च करण्याचं म्हटलं आहे. याची सुरूवात पुढील वर्षापासून करण्यात येणार आहे. हिंदी भाषेला प्रथम मान्यता देण्यात येणार आहे. हे फिचर सध्या इंग्रजीत भाषेतून उपलब्ध असल्यामुळे अनेक भाषा आता पुढील वर्षापासून युझर्संना पाहायला मिळणार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फाइल्स अॅप सरकारी डॉक्युमेंट्स आयडेन्टिफाय करुन त्यांना सिंगल फोल्डरमध्ये ऑर्गनाइज करु शकते. कंपनी पुढील वर्षात यूट्यूब क्रिएटर्ससोबत मिळून एक कोर्स देखील लॉन्च करणार आहे. कंटेन्ट् क्रिएटर्स हा कोर्स मॉनिटाइज करु शकतात. शिवाय कंपनीने National eGovernance Divisonसोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे. गुगल वाणी या नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. बंगळुरूमध्ये हे अॅप तयार केलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : फिरोजपूरच्या जीरामध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार; आंदोलकांनी तोडले बॅरिकेड्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -