घरदेश-विदेशएक वर्षाच्या बाळाला बीअर पाजणाऱ्या पित्याला अटक

एक वर्षाच्या बाळाला बीअर पाजणाऱ्या पित्याला अटक

Subscribe

स्वतःच्या मुलाला बीअर पाजून व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल. यानंतर पोलिसांनी केली कारवाई

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची अधिक काळजी आई वडिल घेतात. मुलाचे आरोग्य स्थिर रहावे यासाठी त्याला पौष्टीक आहार देतात. मात्र एक वर्षच्या बाळाला दारु पाजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीअर पाजणाऱ्या बापाला श्रीलंकन पोलिसांनी मंगळवारी अटक केले आहे. मुलाच्या तोडांला बीअरची बाटली लावून हा पिता मुलाला बीअर पाजत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनुराधापुराच्या उत्तर मध्यवर्ती जिल्ह्यातील मेघालवा गावात ही घटना घडली. मुलाला बीअर पाजत असतानाचा व्हिडिओ त्याच्या मित्रांनी मोबाईलमध्ये काढला होता. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. पोलिसांनी या एक वर्षाच्या मुलाला वैज्ञकीय तपासणीसाठी पाठवले असून त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळले आहे. वैज्ञकीय अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी या पित्याला अटक केली.

मद्याच्या नशेत त्याने हे कृत केल्याचे चौकशीत समोर आले आहे. या व्हिडिओत लहान बाळाला मुलाला जबरदस्ती बीअर पाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. व्हिडिओत मागून एक व्यक्ती लहान बाळाला बीअर नको पाजू असा ही आवाज येत आहे. तरीही या इसमाने बाळाला बीअर पाजली.”लहान मुलांवर अत्याचार करण्याच्या अरोपा अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. पित्याला त्याच्या मित्रांबरोबर अटक करण्यात आले. ज्यामध्ये व्हिडिओ बनवणाऱ्याचाही समावेश आहे. लहान वयात बीअर आणि तंबाखू सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे मुलाला सध्या त्याच्या आईकडे देण्यात आले आहे” – पोलीस प्रवक्ते रुण गुनेशेकरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -