घरदेश-विदेशस्वतःला संपवण्यापुर्वी त्याने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या

स्वतःला संपवण्यापुर्वी त्याने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या

Subscribe

ही घटना घडल्यानंतर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त झाली.

उत्तरप्रदेशातील गाजियाबादमधील मसूरी येथे एक धक्कादायक घटना घडली. गाजियाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह तीन मुलांना संपवून स्वत:ला देखील संपविल्याचे समोर आहे. ही घटना घडल्यानंतर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीच्या शेजारी सुसाईड नोट लिहिलेली सापडली. या नोटमध्ये त्याने खून आणि आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.

पत्नी माझ्यावर वारंवार संशय घेत असल्याने त्या व्यक्तीने कुटुंबास संपवून स्वत: ने देखील आत्महत्या केली. पतीचे इतरांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी वारंवार घेत असल्याने या हत्येचा प्रकार घडला आहे. तसेच मुलांना विष दिल्यानंतर मुलांचे तोंड टेपने बंद केले असल्याचे त्या व्यक्तीच्या घरी सापडलेल्या नोटमध्ये लिहीले होता. हा आत्महत्या करणारा व्यक्ती अनेक वर्षांपासून बेरोजगार असून त्याची पत्नी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -