घरताज्या घडामोडीअफगाणिस्तान : मिलिटरी अकादमीजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला; ६ जण ठार

अफगाणिस्तान : मिलिटरी अकादमीजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला; ६ जण ठार

Subscribe

अफगाणिस्तानच्या मिलिटरी अकादमीजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला असून या हल्ल्यात ६ जण ठार झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या मिलिटरी अकादमीजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून यामध्ये चार जण हे लष्करी जवान असून दोन जण नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून तालिबानने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या हल्ल्याबाबत अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्विकारलेली नाही.

याआधीही झाला होता हल्ला

मिलिटरी अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या पोलीस चेकपॉईंटजवळ हा आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला असल्याची माहिती अफगाण सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, याआधी नोव्हेंबर महिन्यात काबूलमध्ये मोठा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. मिलिटरी अकादमीवर यापूर्वीही हल्ला करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तान : मिलिटरी अकादमीजवळ आत्मघाती बॉम्ब हल्ला; ६ ठार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -