घरताज्या घडामोडीअपघातात मुलाला गमावले; पण, आई - वडिलांनी खड्डे बुजविण्याचे ठरवले

अपघातात मुलाला गमावले; पण, आई – वडिलांनी खड्डे बुजविण्याचे ठरवले

Subscribe

रस्ते अपघातात आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आई - वडिलांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे अनोखे अभियान सुरु केले आहे.

रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे नाहक बळी गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. तसेच बऱ्याच आई – वडिलांनी खड्ड्यामधील अपघातात आपल्या तरुण मुलांना देखील गमावले आहे. मात्र, आई – वडिलांनी आपल्या मुलाला गमावल्यानंतर अनोखे असे अभियान सुरु केले आहे. रस्ते अपघातात आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज वाधवा यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे अनोखे अभियान सुरु केले आहे.

नेमके काय घडले?

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय राजमार्गावर बाटा चौकाजवळच्या रस्त्यावर १० फ्रेबुवारी २०१४ रोजी मनोज वाधना आपल्या पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलासोबत येत होते. दरम्यान, पाण्याने भरलेल्या खड्यात त्यांची स्कूटर गेली आणि स्कूटरवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत मुलगा पवित्रला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीत त्यांना आपल्या ३ वर्षाच्या मुलाला गमवावे लागले. या अपघातप्रकरणी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी धरले असून त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज वाधवा यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे अनोख अभियान सुरु केले आहे.


हेही वाचा – केजरीवाल आणि ‘व्हॅलेंटाईन डे’च खास नातं

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -