घरदेश-विदेशCode Word ने खळबळ: केजरीवालांनी मागवलेल्या १५ किलो तूपाचा सुकेशने केला खुलासा;...

Code Word ने खळबळ: केजरीवालांनी मागवलेल्या १५ किलो तूपाचा सुकेशने केला खुलासा; म्हणाला, ते ‘तूप’ म्हणजे…

Subscribe

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोर्डवर्ड वापरुन 15 कोटी मागितल्याचे सुकेश चंद्रशेखर याने सांगितले आहे. सुकेश भ्रष्टाचार आणि पैशांच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर जेलमधून सतत लेटर बॉम्ब टाकत आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा त्याने दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोर्डवर्ड वापरुन 15 कोटी मागितल्याचे सुकेश चंद्रशेखर याने सांगितले आहे. सुकेश भ्रष्टाचार आणि पैशांच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याने काही दिवसांपूर्वी केजरीवालांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचे म्हटले होते. Sukesh Chandrasekhar has said that Chief Minister Arvind Kejriwal asked for 15 crores using code word Ghee

केजरीवाल आणि टीआरएस पार्टीचे र‌ॅकेट असल्याचा दावा चंद्रशेखर याने केला आहे. केजरीवांसोबत झालेलं चॅट देखील माझ्याजवळ आहे, असा दावा त्याने केला आहे. त्यात त्यांनी 15 कोटी रुपये बीआरएस कार्यालयात पोहचवं असं मला सांगितल्याचा दावा चंद्रशेखर याने केला आहे. टीआरएस नेत्यांना हे पैसे मिळाल्याचा देखील या चॅटमध्ये उल्लेख केल्याचे सुकेशने म्हटले आहे. हे निर्देश केजरीवाल आणि सत्येंद्र जैनसारख्या आपच्या नेत्यांनी दिले होते, असा दावा चंद्रशेखर याने केला आहे.

- Advertisement -

एका प्रेस रिलिजमध्ये सुकेश याने हा दावा केला आहे. दारु कांडातील हे प्रकरण आहे. या डिलिव्हरीला @15 किलोग्राम घी असा कोर्डवर्ड वापरुन सहकारी अरुण पिल्लाई यांना देण्यास सांगितले होते. या व्यक्तीने हे पैसे त्याच्या काळ्या रंगाच्या Range Rover Sport मध्ये ठेवले होते. ही कार टीआरएस मुख्यालयात होती आणि त्यावर एमएलसीचा स्टीकर लावलेला होता, असेही त्याने म्हटले आहे.

( हेही वाचा: Britain’s First Lady ची पद्म पुरस्काराला हजेरी; अधिकाऱ्यांनी केली ही चूक… )

- Advertisement -

…तर माझी नार्को, पाॅलिग्राफ टेस्ट करा

सुकेश चंद्रशेखर पुढे म्हणाला की, तर तुम्हाला हे दावे खोटे वाटत असतील तर माझी नार्को, पाॅलिग्राफ किंवा अन्य कोणत्याही चाचण्या करा मी तयार आहे. मी प्रत्येक दाव्याला पुरावा देत नाही, असेही सुकेशने म्हटले आहे. त्याच्याकडे केजरीवाल आणि त्याच्यातील Whatsapp आणि Telegram चॅटचे 700 पानांचे स्क्रीन शाॅट असल्याचाही दावा त्याने केला आहे.

सुकेश याने आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे टीआरएस आणि त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रसंगी आर्थिक व्यवहार झाले आहेत. शेवटच्या पत्रात सुकेश याने आम आदमी पार्टी हटवा, केजरीवाल यांना हाकलून द्या, केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारापासून दिल्ली आणि देशाला वाचवा, असेदेखील लिहिले आहे.

आता सुकेश चंद्रशेखर याने आम आदमी पार्टीवर लेटरबॉम्ब टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 10 मार्च रोजी पटियाला कोर्टातून बाहेर पडल्यानंतर सुकेश चंद्रशेखर याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, दावा केला होता की अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाणार आहे. सुकेश म्हणाला होता, केजरीवाल यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तो मी उघड करणार. यापूर्वी त्याने सीएम केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर ५ पानी पत्र लिहून गंभीर आरोप केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -