घरताज्या घडामोडीप्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तेलंगणाच्या राज्यपाल पुढे सरसावल्या, नेमकं काय घडलं?

प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तेलंगणाच्या राज्यपाल पुढे सरसावल्या, नेमकं काय घडलं?

Subscribe

विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशासोबत एक धक्कादायक घटना घडली. त्याला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. विमान हवेत असल्यामुळे प्रवाशाला रूग्णालयात नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे या विमानात कुणी असं आहे का?, की जे रूग्णावर उपचार करू शकतील?, असतील तर कृपया आमची मदत करा, अशी अनाऊन्समेंट करण्यात आली. यावेळी ही अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी विमानातील रूग्णावर उपचार केले अन् प्रवाशाचा जीव वाचला.

नेमकं असं काय घडलं?

दिल्ली-हैदराबाद फ्लाईटमध्ये काल(शनिवार) एक घटना घडली. तेलंगणाच्या राज्यपाल सुंदरराजन या विमानात प्रवास करत होत्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे जेव्हा विमानात प्रवाशासोबत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रूग्णाला मदत केली आणि त्याचे प्राण वाचवले.

- Advertisement -

१९९४ च्या बॅचचे आयपीएस आणि डीजीपी रँकचे अधिकारी कृपानंद त्रिपाठी उजेला हे देखील विमानात प्रवास करत होते. मात्र, विमानात प्रवास करताना त्यांना अचानकपणे त्रास जाणवू लागला. त्यानंतर तमिलिसाई सुंदरराजन यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला. विमानात अचानकपणे मला त्रास होऊ लागला. यावेळी तमिलिसाई सुंदरराजन यांनी माझी तपासणी केली. तेव्हा माझ्या हृदयाचे ३९ ठोके होते. परंतु त्यांनी माझ्यावर उपचार केल्यामुळे माझा श्वासोच्छ्वास स्थिर झाला. त्यांनी मला नवीन जीवदान दिलंय, असं कृपानंद त्रिपाठी उजेला म्हणाले.


हेही वाचा : पक्षाची काय अवस्था करून टाकलीय, संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे; फडणवीसांचा टोला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -