घरमहाराष्ट्रपुणेसोलापूर- गाणगापूर बसला अपघात, अनेक गंभीर, जखमींना 50 हजारांची मदत

सोलापूर- गाणगापूर बसला अपघात, अनेक गंभीर, जखमींना 50 हजारांची मदत

Subscribe

सोलापूर-गाणगापूर बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एस टी बस अपघातातील जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर केले आहेत.

- Advertisement -

सोलापूर-गाणगापूर बस अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली. यावेळी जखमी तसेच इतर प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटली – 

- Advertisement -

अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. अपघातात ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी ३० रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवले, तर इतर रुग्णांवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात, तर दोघांवर अक्कलकोटच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -