घरक्राइमTelangana nurse’s brutal murder : प्रशिक्षणार्थी नर्सचे डोळे काढले; मृतदेह आढळला तलावात

Telangana nurse’s brutal murder : प्रशिक्षणार्थी नर्सचे डोळे काढले; मृतदेह आढळला तलावात

Subscribe

Telangana nurse’s brutal murder : नवी दिल्ली : तेलंगणामध्ये एका प्रशिक्षणार्थी 19 वर्षीय नर्सची निर्घृण हत्येची (A 19-year-old trainee nurse was brutally murdered) धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेकऱ्याने स्क्रू ड्रायव्हरने तरुणीचे डोळे काढले, ब्लेडने गळा चिरला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीचा मृतदेह तलावात फेकून दिला. या धक्कादायक घटनेने विकाराबाद जिल्ह्यातील कालापूर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Telangana nurse’s brutal murder: Trainee nurse’s eyes gouged out; The body was found in the lake)

जट्टू सिरीषा  (Jattu Sirisha) असे मृत नर्सचे नाव आहे. इंटरमिजिएटची विद्यार्थिनी असलेल्या शिरीषाने नुकताच पॅरामेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. याशिवाय ती विकाराबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून ती काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास जेवण न केल्याच्या कारणावरून वडील जंगय्या आणि मेहुणा अनिल यांच्याशी भांडण करून घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती न सापडल्याने कुटुंबाने पोलिसांत तरुणीची हरवल्याची तक्रार दाखल केली. परंतु दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात आढळून आला.

- Advertisement -

पोलिसांना तरुणीची मृतदेह तलावातून बाहेर काढला असता तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. प्राथमिक माहितीनुसार, मारेकऱ्याने तरुणीच्या डोळ्याला स्क्रू ड्रायव्हरने गंभीर दुखापत केली आहे. तसेच ब्लेडने गळ्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली असावी अशा पोलिसांना संशय आहे. याशिवाय तरुणीच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जखमा आढळून आल्या आहेत. शिरीषाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परीगीचे डीएसपी करुणासागर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

तरुणी आत्महत्या करणार असल्याचे सांगून घरातील निघाली
मिळालेल्या माहितीनुसार, रविवावारी (11 जून) रात्री उशीरा शिरीषाचे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा अनिलसोबत भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. अनिलने भांडण सुरू असताना रागाच्या भरात शिरीषाला कानाखाली मारली होती. त्यानंतर शिरीषा घरातून बाहेर पडली आणि जाताना आत्महत्या करणार असल्याचे सांगून निघून गेली. त्यानंतर काही तासांनी शिरीषाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

शिरीषाच्या बहिणीच्या निकालाची चौकशी सुरू
डीएसपी म्हणाले की, शिरीषाच्या हत्येप्रकरणी तिच्या पालकांची आधीच चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय शिरीषाच्या बहिणीचा नवरा अनिल याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय शिरीषाच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात येत आहे. शिरीषाच्या हत्येत एकाच व्यक्तीचा हात नसून अनेक लोक सहभागी असू शकतात आणि हे प्रकरण लवकरच निकाली काढू, अशी माहिती डीएसपी करुणासागर यांनी दिली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -