घरताज्या घडामोडीमोठी बातमी! छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद

Subscribe

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी ही घटना घडली असून, या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते.

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी ही घटना घडली असून, या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. शिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटात जवानांचे वाहन उडवले. (Ten Soldiers martyred in Naxal attack in Chhattisgarh)

दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेली दरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे. या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले.

- Advertisement -

आठवडाभरापूर्वी आमदारांच्या ताफ्यावर हल्ला

विजापूरमधील काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी आठवड्याभरापूर्वी हल्ला केला होता. जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप ज्या वाहनात बसल्या होत्या त्या वाहनाला गोळ्या लागल्या. सर्वजण सुरक्षित आहेत. आमदार विक्रम मांडवी, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस नेते गांगलूरला गेले होते. येथील साप्ताहिक हाट बाजारात मंगळवारी नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतत असताना पडेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी चालत्या वाहनांवर गोळीबार केला.

- Advertisement -

IED हल्ल्यात 11 जवान शहीद

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- दंतेवाडा येथे सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.


हेही वाचा – दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या डॉ. शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -