घरमहाराष्ट्रआमच्यावर कारवाई.. मग दादा भुसे, राहुल कूल यांच्यावर का नाही?, संजय राऊतांचा...

आमच्यावर कारवाई.. मग दादा भुसे, राहुल कूल यांच्यावर का नाही?, संजय राऊतांचा प्रश्न

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांच्या मागे सातत्याने ईडी, सीबीआयच्या चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार विरोधकांकडून देखील सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, असे बोलले जात आहेत. पण असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) आणि भाजपच्या आमदारांशी संबंधित घोटाळे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांच्या मागे सातत्याने ईडी, सीबीआयच्या चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार विरोधकांकडून देखील सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, असे बोलले जात आहेत. पण असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) आणि भाजपच्या आमदारांशी संबंधित घोटाळे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतचे पुरावे देखील राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलण्यासाठी त्यांनी फडणवीस यांच्याकडे भेटायची वेळ मागितली असल्याचे देखील राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण फडणवीस मात्र टाळाटाळ करत असल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि भाजपचे दौंडचे आमदार राहुल कूल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहे. दादा भूसे यांनी गिरणा सहकारी कारखान्यात तर राहुल कूल यांनी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. याबाबतचे सर्व पुरावे देऊन देखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “देशभरामध्ये विरोधी पक्षाचे अनेक प्रमुख नेते किरकोळ कारणांवरून तुरूंगात गेले. महाराष्ट्रात अनिल देशमुख असतील, मी स्वतः असेल, नवाब मलिक आहेत. आता हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात भाजप कारवाई करत आहेत. मनिष सिसोदीया असतील, अजुन काही त्यांचे आमदार असतील… प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षावर कारवाई करत आहेत. 10-20 लाखांचा व्यवहार आढळला तरी कारवाई करण्यात येते. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचता. पण मी दोन प्रकरणे समोर आणली.”

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे रमले शेतात, फळबागांची केली पाहाणी

- Advertisement -

“दादा भुसे जे मंत्री आहेत. त्यांनी मालेगावचा गिरणा कारखाना बचाव नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये जमा केले. हा अधिकृत आकडा 100 कोटींच्या वर आहे आणि त्यांच्याकडून ते नाकारण्यात आलेले नाही. कारखाना नाही पण त्या पैशांचे काय झाले. कुठे आहे कारखाना? असे म्हणत त्यांनी सांगितले की त्या चौकशीची आम्ही मागणी केली तर म्हणतात आम्ही नशेत आहोत. मग तुम्ही जे आमच्यावर कारवाया करत आहात, मग तुम्ही कोणत्या नशेत आहात,” असे सांगत फडणवीसांवर टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “दौंडच्या कारखान्याचा आॅडीट रिपोर्ट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. आमची लढाई राहुल कूल यांच्याविरोधात नसून दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, ज्यांनी 500 कोटींचा घोटाळा म्हणजेच ज्याला मनी लाँड्रिंग बोलतो. त्याच्या चौकशीची मागणी आमच्याकडून करण्यात आली आहे. बाकी काय करतोय? याबाबत फडणवीस यांना पुराव्यासहित 10 पत्र पाठवले आहेत. भेटीची वेळ मागितली आहे. या राज्यात सहकार खात्यात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याचे मला काही पुरावे द्यायचे आहेत. पण त्यांना वेळ नाहीये. कोणत्या नशेत हे सरकार फिकतय? मला माहित नाही,” अशी माहिती संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना फटकराले आहे.

दादा भुसे, राहुल कूल यांच्यावर कारवाई करणार नसाल तर…
ही शेतकऱ्यांची लढाई आहे, त्यामुळे आम्ही दौंडमध्ये येणारच. पण भीमा-पाटस साखर कारखान्याचे चेअरमन किंवा दादा भुसे यांच्यावर एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात येणार नसेल तर महाराष्ट्रात ज्या-ज्या विरोधी पक्षातील लोकांवर तुम्ही अशा प्रकारचे खोटे एफआयआर करून, गुन्हे दाखल करून आर्थिक गुन्ह्यांच्या नावाखाली ज्या कारवाया केल्या, तुरूंगात टाकले. ते सगळे गुन्हे तुम्हाला मागे घ्यावे लागतील. या दोघांवर गुन्हे दाखल करा, नाही तर हे सरकार लफंग्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे, असे सागंत संजय राऊत यांच्याकडून शाब्दिक हल्ला करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -