घरदेश-विदेशDawood Ibrahim: दाऊद इब्राहिमने बालपण घालवलेलं घर लिलावात; 'या' मालमत्तांवरही टाच

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमने बालपण घालवलेलं घर लिलावात; ‘या’ मालमत्तांवरही टाच

Subscribe

हशतवादी दाऊद इब्राहिमचे बालपणीचे घर आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तीन मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे.

मुंबई: दहशतवादी दाऊद इब्राहिमचे बालपणीचे घर आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तीन मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. चारही मालमत्ता शेतजमिनीच्या रुपात असून मुंबके गावात या मालमत्ता आहेत. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन (जप्ती मालमत्ता) कायदा (SAFEMA) अंतर्गत अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता जप्त केली आहे. (Terrorist Dawood Ibrahim s childhood home and three properties owned by his family in Khed taluka of Maharashtra s Ratnagiri district will be auctioned on Friday)

समोर आलेल्या वृत्तानुसार हा लिलाव 5 जानेवारीला मुंबईत होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास 20 गुंठ्याहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हाजर 280 रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत 21 नोव्हेंबर 2023 रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.

- Advertisement -

गेल्या नऊ वर्षांत दाऊद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या 11 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. यामध्ये एक रेस्टॉरंट 4.53 कोटी रुपयांना विकले गेले, 3.53 कोटी रुपयांना विकले गेलेले सहा फ्लॅट आणि 3.52 कोटी रुपयांना विकले गेलेले गेस्ट हाऊस यांचा समावेश आहे.

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम 1983 मध्ये मुंबईत येण्यापूर्वी मुंबके गावात राहत होता. साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याने भारत सोडला, ज्यात 257 लोकांचा मृत्यू झाला. 12 मार्च 1993 रोजी मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले, ज्यात 257 लोक मारले गेले, 700 हून अधिक जखमी झाले आणि सुमारे 27 कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले. 16 जून 2017 रोजी मुस्तफा डोसा आणि अबू सालेमसह अनेक आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमने हल्ल्याची योजना आखली होती. दाऊद इब्राहिमबद्दल असे म्हटले जाते की तो पाकिस्तानातील कराचीमध्ये राहतो.

( हेही वाचा: Pune Crime : ‘तिची’ थर्टी फर्स्टची झिंग उतरलीच नाही; सोसायटीचं गेट बंद करून तरुणीचा राडा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -