घरक्राइमRape Case : वाराणसीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; Congress कडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न

Rape Case : वाराणसीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; Congress कडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न

Subscribe

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापत आहे. विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून भाजपावर टीकेचे बाण सोडले जात असून, करतानाच सरकारला धारेवर धरलं जात आहे.

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमधील काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. मात्र, यातील आरोप सोमवारी (1 जानेवारी) अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी भाजपशी संबंधित असल्याने याप्रकरणावरून काँग्रेसकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. (Rape Case Gang rape of student in Varanasi Attempt by Congress to surround BJP)

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापत आहे. विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून भाजपावर टीकेचे बाण सोडले जात असून, करतानाच सरकारला धारेवर धरलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा कळीचा ठरू शकतो हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Singh: निलंबित होऊनही करणार राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन; कुस्ती संघटना अन् क्रीडा मंत्रालयातच जुंपली

हे आहे नेमकं अत्याचार प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठात 1 नोव्हेंबर रोजी एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. मागील दोन महिन्यांत या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून ठोस अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र नवीन वर्ष उजाडताच सोमवारी (1 जानेवारी) या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल पांडे (28), सक्षम पटेल (20) आणि अभिषेक चौहान (22) अशी या तिघा आरोपींची नावं आहेत. यातील चौहान याच्यावर 2022 मध्ये मारहाण, धमकी आणि दंगल माजवण्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : CM Eknath Shinde : राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचं- CM एकनाथ शिंदे

आरोपी भाजप आयटी सेलचे सदस्य

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फेसबुक प्रोफाइल पोलिसांनी तपासली असता तीनही आरोपी भाजपाच्या वाराणसीतील आयटी सेलचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. यातील कुणाल पांडे हा भाजपाच्या वाराणसी आयटी सेलचा कोऑर्डिनेटर आणि सक्षम पटेल हा सहाय्यक कोऑर्डिनेटर असल्याचं समोर आलं आहे. तर कुणाल पांडे व सक्षम पटेल या दोघांनी त्यांच्या प्रोफाइलवर भाजपाच्या अनेक नेत्यांबरोबरचे फोटो पोस्ट केलं आहेत. हे सर्व फोटो प्रामुख्याने मागील तीन वर्षांमधील आहेत हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -