घरदेश-विदेशविमानात 'दहशतवादी' घुसल्याचा केला विनोद, तरुणाला घेतले ताब्यात

विमानात ‘दहशतवादी’ घुसल्याचा केला विनोद, तरुणाला घेतले ताब्यात

Subscribe

जेट एअरवेजचे 9W 472 हे कलकत्ता- मुंबई विमान सकाळी ९ वाजता उड्डाण करणार होते. यावेळी एक २१ वर्षीय पोद्दार नावाचा तरुण विमानात चढला. आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्याने लगेचच आपले तोंड रुमालाने बांधून घेतले आणि तो त्याच्या फोनवरुन कोणाला तरी मेसेज करु लागला.

आज मुंबईवरील २६/ ११ हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यापासून ते कसाबला फासाला लटकेपर्यंतचा एक- एक क्षण मुंबईकरांना आजही लक्षात आहे. देशसुरक्षा हा गांर्भीयाचा विषय असताना देखील विमानात एका प्रवासाने दहशतवादी घुसल्याचे मेसेज केले. पण हा सगळा विनोद असल्याचे जेव्हा कळले. तेव्हा अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा… पण असा विनोद करणाऱ्या त्या मुलाला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे पाहा- हवेतच जेट एअरवेजच्या प्रवाशांना इजा! नक्की घडलं काय?
वाचा- एअर इंडियाच्या पायलटचा बेफिकीरपणा

नेमकं काय घडलं ?

जेट एअरवेजचे 9W 472 हे कलकत्ता- मुंबई विमान सकाळी ९ वाजता उड्डाण करणार होते. यावेळी एक २१ वर्षीय योग वेदांत पोद्दार नावाचा तरुण विमानात चढला. आपल्या जागेवर जाऊन बसला आणि त्याने लगेचच आपले तोंड रुमालाने बांधून घेतले आणि तो त्याच्या फोनवरुन कोणाला तरी मेसेज करु लागला. त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर त्या प्रवाशाने डोकावून पाहिल्यानंतर त्याचा मेसेज पाहिला. त्यात त्याने ‘Terriost on a flight. i destroy women’s heart ‘ हा मेसेज पाहिल्या पाहिल्या त्या प्रवाशाने कॅबिन क्रू मेंबरला ही माहिती दिली आणि मग त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -
हे माहित आहे का ? –धक्कादायक: एअर इंडियांच्या विमानातून कर्मचारी खाली पडली

काय आले चौकशीत समोर?

पोलिसांनी पोद्दारला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत अन्य ५ मित्र देखील या विमानत असल्याचे कळाले. त्याचा मोबाईल तपासल्यानंतर त्याने असे मेसेज पाठवल्याचे देखील कळले. त्यानंतर त्याचे सामान तपासण्यात आले. त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. अधिक चौकशी केल्यावर त्याने दहशतवादी असल्याची मस्करी केल्याचे पोलिसांना सांगितले. हा मुलगा मुंबईत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी जात होता. त्याच्या या विनोदामुळे विमान तब्बल १ तास १० मिनिटे उशिरा उडाले.

 हे देखील बघा- जेट एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -