घरमुंबईरणबीर कपूरच्या बहिणीवर चोरीचा आरोप

रणबीर कपूरच्या बहिणीवर चोरीचा आरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर हिच्यावर ज्वेलरीची डिझाइन चोरी केल्याचा आरोप सोशल मीडियावर लावण्यात आले आहे.

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर हिच्यावर ज्वेलरीची डिझाइन चोरी केल्याचा आरोप सोशल मीडियावर लावण्यात आले आहे. रिद्धिमाने नुकतेच आपले ज्वेलरी कलेक्शनचे फोटो शेअर केले होते यामध्ये स्पेशल ज्वेलरी म्हणून प्रकाशित करण्यात आलेल्या दागिण्यांची डिझाइन चोरी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धिमानी मोती आणि डायमंडची डिझाइन सोशल मीडियातून शेअर केली होती. हा आरोप ‘dietsabya’ या इन्स्टाग्राम अकाउंटकडून केला गेला आहे. यानंतर रिद्धिमाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला दागिण्यांचा फोटोही डिलिट केला. अद्याप रिद्धिमाने यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.

 काय आहे प्रकरण

रिद्धिमा कपूरने एक ज्वेलरी डिझाइन नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम वरून शेअर केली होती. ही डिझाइन ‘कोकीची मिकीमोटो’ ची असल्याचा दावा करण्यात आला. रिद्धिमाने फक्त डिझाइनच नाही तर पूर्ण फोटोच कॉपी करून टाकला आहे. dietsabya ने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रिद्धिमाने शेअर केलेला फोटो आणि कोकीचे डिझाइन शेअर केले आहेत. कोकीची मिकीमोटो कंपनी जगामध्ये पर्ल किंग च्या नावाने ओळखली जाते. १९१६ पासून ही कपंनी दागिण्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -