घरदेश-विदेशएअर इंडियाच्या पायलटचा बेफिकीरपणा

एअर इंडियाच्या पायलटचा बेफिकीरपणा

Subscribe

पायलट ब्रेथ अॅनायालझर टेस्ट करायला विसरला म्हणून दिल्ली - बँकॉक विमान उड्डाणाच्या अर्ध्यातासानंतर दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

एअर इंडियाच्या पायलटच्या बेफिकीरपणामुळे प्रवाशांना मात्र नाहस त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी एअर इंडियाच्या AI332 या दिल्ली – बँकॉक विमानानं दिल्ली विमानतळावरून उड्डाण केलं. पण, केवळ अर्ध्या तासात विमान पुन्हा एकदा दिल्ली विमातळावर लँड झालं. त्याला कारणीभूत ठरला तो सह-पायलटचा बेफीकीरपणा. उड्डाणापूर्वी पायलटनं ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करणं गरजेचं असतं. पण, सह-पायलट अरविंद कटपालिया मात्र ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करायला विसरले. त्यामुळे उड्डाणाच्या अर्ध्यातासानंतर विमान पुन्हा एकदा दिल्ली विमानतळाकडे वळले. पण, प्रवाशांना मात्र याची कोणतीही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पाहायाला मिळाली. या साऱ्या घडामोडमुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी आपली नाराजी सोशल मीडियावर मांडली आहे.

काय आहे नियम?

कोणत्याही पायलटला उड्डाणापूर्वी ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करणं करणं गरजेचं आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी पायलट १२ तास अगोदर दारू प्यायला आहे किंवा नाही हे तपासणं हा यातील उद्देश आहे. ब्रेथ अॅनालायझरचा हा नियम सर्वांना लागू आहे.

- Advertisement -

अरविंद कटपालियांची दुसऱ्यांदा चूक

एअर इंडियाच्या AI332 या दिल्ली – बँकॉक विमानाचे सह – पायलट असलेल्या अरविंद कटपालिया यांची ही चूक दुसऱ्यांदा झाली आहे. यापूर्वी २०१७मध्ये देखील अरविंद कटपालिया यांचा विमान उड्डाणाचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात आला होता. त्यावेळी देखील कटपालिया यांनी ब्रेथ अॅनालायझर टेस्ट केलेली नव्हती. डीजीसीएनं त्यांच्याविरोधात ही कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिच चूक अरविंद कटपालिया यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -