घरदेश-विदेशतुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही; चीनने भारताला चिथवलं

तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही; चीनने भारताला चिथवलं

Subscribe

चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असं ग्लोबल टाईम्समधून म्हटलं आहे.

भारत-चीन सीमावदावरील तणाव कमी करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समधून करण्यात आला आहे. “सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि त्यावर बंदी आणणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहिम होती घेतली आहे. ग्लोबल टाईम्समध्ये सोनम वांगचूक यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी युट्यूबर एक व्हिडीओ टाकत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची विनंती केली होती. “सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्ती सामान्य भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत,” असंही यात म्हटलं आहे. “भारत-चीन सीमेवर असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं शांघाय इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा सुरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -